मौजेमजेसाठी पदवीधर तरुणांकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस...!! 14 दुचाकी हस्तगत, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकांची कामगिरी.!! ...
मौजेमजेसाठी पदवीधर तरुणांकडून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस...!! 14 दुचाकी हस्तगत, पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 5 च्या पथकांची कामगिरी.!!
सौ. कलावती गवळी पुणे शहर प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मौजमजेसाठी दुचाकीची चोरी करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरलेल्या दुचाकीची विक्री करण्यासाठी तरुणाने सोशल मीडियावरील जाहिरात यंत्रणेचा वापर करत असल्याचे उघडकीस आले. जवळपास साडे आठ लाख रुपयांच्या 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. महादेव शिवाजी गरड (वय 26 ) रा. मांजरी हडपसर मूळ रा. चाकूर जि. लातूर ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट पाच चे पथक रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करीत असताना. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या संशयावरुन महादेव गरड ला ताब्यात घेवून अधिक चौकशी केल्यानंतर त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडूंन सुमारे 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. गरड याने हडपसरमधून 6 तर पिंपरी-चिंचवडमधून दोन पाच दुचाकी अशा 14 दुचाकी चोरल्या आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, अभिजीत पवार,विनोद शिवले, प्रताप गायकवाड,विनोद निंभोरे, अमित कांबळे,अकबर शेख,राजस शेख प्रमोद टिळेकर,स्वाती तुपे,पल्लवी मोरे यांनीही कामगिरी केली आहे.
No comments