डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 27 जुलै रोजीच होणार म्हणजे होणारच...मनपा आयुक्त यशवंत डांगे सचिन मोकळं अहिल्यानग...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण 27 जुलै रोजीच होणार म्हणजे होणारच...मनपा आयुक्त यशवंत डांगे
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.16 जुलै):- शहरातील मार्केटयार्ड चौकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे परंतु त्याचा अनावरण सोहळा झाला नाही. समस्त आंबेडकरी समाजाची मागणी होती की मोठ्या थाटामाटात अनावरण सोहळा झाला पाहिजे,अखेर आंबेडकरी समाजाच्या लढ्याला यश आले असून 27 जुलै 2025 रोजी पुतळ्याचे अनावरण होणार असून याबाबत समिती व संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची आज भेट घेऊन 27 जुलै 1978 या ऐतिहासिक दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठावाडा विदयापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,हा ठराव मंजूर करण्यात आल्याने या दिवसाला एक वेगळे महत्व आहे.म्हणून आंबेडकरी जनतेच्या भावनांचा आदर करत मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी 27 जुलै 2025 रोजीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मोठया जल्लोषात करण्यात येईल,असा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती व आंबेडकरी समाजाला देण्यात आला. यावेळी मोठ्या आंबेडकर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments