वेळोदे येथे भारतीय बौध्द महासभाच्या वतीने वर्षावास पुष्प 3रे कार्यक्रम संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वेळोदे ता.च...
वेळोदे येथे भारतीय बौध्द महासभाच्या वतीने वर्षावास पुष्प 3रे कार्यक्रम संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वेळोदे ता.चोपडा येथे दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका यांच्या वतीने रमाई नगर वेळोदे येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तिमाई वर्षवास कार्यक्रम निमित्ताने वर्षावास पुष्प 3रे चे उद्घाटन शालिग्राम व्यंकट करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तालुका अध्यक्ष बापूराव गिरधर वाणे व शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले. आलेले सर्व मान्यवर कार्यकारणी पदाधिकारी यांचे स्वागत वेळोदे येथील बौद्ध उपासक यांनी केले.
आजच्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या विषय होता भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावर प्रवचनकार रमेश गोबा सोनवणे, बौद्धचार्य यांनी धम्म देसना दिली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुदाम रामदास करंकाळ बौद्धचार्य यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शहराध्यक्ष भरत भीमराव शिरसाठ यांनी केले.
सदर कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बापूराव वाणे, शहराध्यक्ष भरत शिरसाठ, बौद्धाचार्य सुदाम करंकाळ,शालिग्राम करंदीकर ज्येष्ठ मार्गदर्शक जानकीराम सपकाळे व वसंत शिंदे, तसेच ज्ञानेश्वर करंकाळ, ( ग्रामपंचायत सदस्य), रवींद्र करंकाळ, महेंद्र करंकाळ अण्णा करंकाळ,मच्छिंद्र करंकाळ,पोलीस पाटील वेळोदे व समस्त बौद्ध उपासक उपासिका कार्यक्रमास उपस्थित होते.
No comments