adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विधीसंघर्षित बालकांसह दोन आरोपींकडून चार पिस्तूल हस्तगत..!! अल्पवयीन मुलांकडे 40 हजारांचे पिस्टल सापडले, सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी!

  विधीसंघर्षित बालकांसह दोन आरोपींकडून चार पिस्तूल हस्तगत..!! अल्पवयीन मुलांकडे 40 हजारांचे पिस्टल सापडले,  सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी! ...

 विधीसंघर्षित बालकांसह दोन आरोपींकडून चार पिस्तूल हस्तगत..!! अल्पवयीन मुलांकडे 40 हजारांचे पिस्टल सापडले,  सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी!  


संभाजी पुरी गोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 पुण्यात सिंहगड रस्ता पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये दोन विधीसंघर्षित बालकांसह दोन आरोपींकडून एकूण चार पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याप्रकरणी अनिकेत महादेव सोनवणे (वय 26 ) रा. सिद्धार्थनगर तुळजापूर जि. धाराशिव) व किरण विठ्ठल शिंदे (वय 23) रा.जे.एस.पी एम. कॅम्प जवळ नऱ्हे पुणे) अशा दोन आरोपींचा दोन विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक ०४/०७/२०२५ रोजी सिंहगड रस्ता पोलीस ठाणेकडील तपास पथकांचे प्रभारी अधिकारी संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार ओलेकर, पोलीस अंमलदार झगडे, पोलीस अंमलदार देवा  चव्हाण पोलीस अंमलदार सागर भोरडे, पोलीस अंमलदार कांबळे पोलीस अंमलदार मोहिते असे सिंहगड रस्ता रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांच्या आदेशाने प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विनायक मोहीते राहुल ओलेकर व गणेश झगडे यांना त्याचे खास बातमीदारांमर्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड कॉलेजचे क्रिकेट ग्राऊंड बाजुस वडगांव पुणे येथे सार्वजिनक रोडचे कडेला एक इसम संशयरित्या थांबलेला असुन. पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून  सदर ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचा एक इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसल्याने त्यास पकडुन जागीच नाव पत्ता विचारता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे समोर आले असता. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता घेतली असता. त्याच्याजवळ उजवे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये ४०,०००/-रु किंमतीचे एक पिस्टल व १०००/- रु किंमतीचे एक जीवंत काडतुसे मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचे पिस्टल व  जिवंत काडतुसे हे पोलीस स्टेशन चे रेकॉर्ड वरील विधीसंघर्षित बालकांकडुन घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर विधीसंघर्षित बालकांचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे पिस्टल बाबत अधिक तपास केला असता, त्याने सांगितले की, मी काही दिवसांपुर्वी एकुण तीन पिस्टल आणले होते. त्यामधील एक पिस्टल वरिल विधीसंघर्षित बालकांकडे दिले होते एक माझे जवळ ठेवले होते. एक पिस्तूल माझे ओळखीचा अनिकेत सोनवणे रा. तुळजापुर यास दिले होते. असे सांगितल्याने (अनिकेत सोनवणे रा. तुळजापुर जि. धाराशिव) याचा त्याचे प्राप्त पत्यावर जावुन शोध घेतला असता, तो मिळून आला आहे. अनिकेत महादेव सोनवणे (वय २६) रा. सिध्दार्थनगर तुळजापुर जि. धाराशिव ) असे त्याचे नाव आहे. त्यास दाखल गुन्ह्यांत अटक करुन त्याचेकडुनही एक 40,000  रु किंमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले असुन सदर गुन्ह्यात एकुण तीन पिस्टल व एक जिवंत काडतुसे असा एकुण1,21,000 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.

तसेच सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३३६/२०२५ बीएनएस कलम ३०८ (३), ३(५) मधील रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी नामे (दादया मोरे किरण शिंदे रा. वडगांव बुद्रुक पुणे) यांचा तपास पथकांतील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना सराईत रेकॉर्डवरील  तडापीर आरोपी किरण विठ्ठल शिंदे (वय 23) रा. जे.एस.पी.एम कॅम्पसजवळ कृष्णकुंज अपार्टमेट तीसरा मजला, पुणे) याचा शोध घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास समीर कदम सहायक पोलीस निरीक्षक सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सहा पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम पोलीस उप-आयुक्त परीमंडळ - ३. अजय परमार सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, गणेश झगडे, विनायक मोहीते, राहुल ओलेकर, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, सतिश मोरे, यांचे पथकांने केली.

No comments