याबा गोळ्यांची विक्री करणाऱ्या तस्करांच्या फरासखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!! 718 गोळ्या हस्तगत ! फरासखाना पोलीस ठाणेत गुन्हा दाखल.....
याबा गोळ्यांची विक्री करणाऱ्या तस्करांच्या फरासखाना पोलिसांनी आवळल्या मुसक्या...!!
718 गोळ्या हस्तगत ! फरासखाना पोलीस ठाणेत गुन्हा दाखल..!!
सौ. जयश्री घोडके ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कर्नाटकातील अंमलीपदार्थ तस्कराला पुणेतील फरासखाना विश्रामबाग पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या ताब्यांतून 75.36 ग्रॅम वजनाच्या सहा लाख 58 हजार रुपये किंमतीच्या एकूण 718 गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. निशान हबीब मंडल (वय 47) रा. बेंगळुरू कर्नाटक) असे तस्करांचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार निशान मंडल विरोधात अंमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी पथक पेट्रोलिंग करीत असताना पहाटेच्या सुमारांस सापळा लावून आरोपींस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 75.36 ग्रॅम वजनाच्या 718 गोळ्या व एक दुचाकी चार मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सहा लाख 58 हजार 860 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले एसीपी अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे निरीक्षक अजित जाधव सहाय्यक निरीक्षक शितल जाधव पो.उपनिरी अरविंद शिंदे कर्मचारी महेश राठोड प्रवीण पासलकर विशाल शिंदे महेश पवार यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे.
No comments