सावदा येथे नवीन मुस्लिम सुन्नी कब्रस्तानात केसर आंबा आणि काश्मिरी गुलाब रोपांचे वृक्षारोपण रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमका...
सावदा येथे नवीन मुस्लिम सुन्नी कब्रस्तानात केसर आंबा आणि काश्मिरी गुलाब रोपांचे वृक्षारोपण
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा येथील मस्कावद रोडवरील नवीन मुस्लिम सुन्नी कब्रस्तानात पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात ५० केसर आंब्याची आणि काश्मिरी गुलाब लावण्यात आली. हा कार्यक्रम स्थानिक केळी उद्योजक शेर खान आणि शेख याकूब शेख गुलाब यांच्या वैयक्तिक खर्चातून आयोजित करण्यात आला.
या वृक्षारोपण कार्यक्रमाला सावदा शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि कब्रस्तान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष शेख कलीम शेख जलीस यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. यावेळी पत्रकार शेख फरीद शेख नुरोद्दीन, पत्रकार युसुफ शहा, पत्रकार अजहर खान अजमल खान, पत्रकार शेख मुख्तार शेख अरमान, कब्रस्तान कमिटीचे सदस्य फिरोज खान मिस्त्री, शेख नजीर शेख शफीउद्दीन आणि इरफान मिया यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच उत्पन्नाचा मार्ग सापडेल जेणेकरून नवीन मुस्लिम सुन्नी कब्रस्तान कमिटीला येणाऱ्या काळात आर्थिक फायद्या होण्याची संभावना आहे. केळी उद्योजक शेर खान आणि शेख याकूब शेख गुलाब यांनी सांगितले की, “वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर भावी पिढ्यांसाठी देखील एक अमूल्य योगदान आहे. सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आम्ही यापुढेही असे उपक्रम राबवत राहणार आहोत.”
कब्रस्तान कमिटीचे अध्यक्ष शेख कलीम शेख जलीस यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि भविष्यात अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना अधिक बळ देण्याचे आवाहन केले. सावदा शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत याला पाठिंबा दर्शवला आहे.
No comments