विरवली गावात कृषिकन्यांनी केली चारा प्रक्रिया – स्वावलंबीतेचा आदर्श भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विरवली (ता.यावल) बद...
विरवली गावात कृषिकन्यांनी केली चारा प्रक्रिया – स्वावलंबीतेचा आदर्श
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विरवली (ता.यावल) बदलत्या हवामानात आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर शेती व पशुपालनात नवनवीन प्रयोग आवश्यक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील विरवली गावात आलेल्या कृषिकन्यांनी मिळून एक वेगळा प्रयोग केला – स्वतः तयार केलेला प्रक्रिया केलेला चारा. या उपक्रमामुळे गावातील पशुपालकांना चाऱ्याचा पुरवठा सुटसुटीत व स्वस्त दरात मिळेल असे सांगितले. गावात सुरुवातीला फक्त काही शेतकरी एकत्र येऊन ही प्रक्रिया सुरू केला. त्यांनी मका, गहू, भुसा, हरित चारा, आणि खनिज पूरक यांच्या योग्य प्रमाणात मिसळून चारा तयार करण्याची प्रयोग घेतला. त्यासाठी त्यांनी घरातील वापरत येणाऱ्या छोट्या यंत्राचा वापर केला. या प्रक्रियेमुळे तयार होणारा चारा पोषणमूल्यांनी भरलेला, स्वच्छ व दीर्घकाल टिकणारा होतो.या प्रयोगाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात जसे की:- पशुधनाचे दूध उत्पादन वाढले, जनावरांचे आरोग्य सुधारले
बाजारातून महागडा चारा विकत घेण्याची गरज कमी झाली गावात स्वयंपूर्णता आणि उद्योजकतेला चालना मिळाली या कृषिकन्यांनी दाखवलेली कल्पकता ही गावातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ‘स्वावलंबी चारा निर्मिती’चा मार्ग दाखवत शेतीला आणि पशुपालनाला नवा मार्ग दिला .
चारा प्रक्रियाचे संयोजक कृषिकन्या धनश्वेता अहिरे, प्रज्ञा गजरे, ऐश्वर्या सोनवणे, सृष्टी डोंगरे, प्रतीक्षा गावित, विशाखा सोनावणे, यांनी केले. यावेळी शेतकरी पितांबर निळे , कैलाश धनगर, आणि ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. कृषिकन्यांना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. शैलेश तायडे सर, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. म.पी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments