adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - सपोनि विशाल पाटील

 अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - सपोनि विशाल पाटील  भरधाव कारने धडक दिल्याने तरुण जखमी ! रागातून जडीबुटी विक्रेत्यांना मारहाण दं...

 अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - सपोनि विशाल पाटील 

भरधाव कारने धडक दिल्याने तरुण जखमी ! रागातून जडीबुटी विक्रेत्यांना मारहाण दंगलीचा व अपघाताचा गुन्हा दाखल 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 हरीयाना राज्यातुन 6/7 जडी बुटी विक्री करुन व्यवसाय करणारे लोक हे मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणुपर येथे राहण्यास आलेले आहे त्यापैकी 2 लोक हे आज दि.20/07/2025 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास त्यांचेकडील जडी बुटी विक्री करण्यासाठी रावेर तालुक्यातील रसलपुर गावी आले होते. तेथे पेशंटची नाडी तपासणी करतांना त्यांचे पेशंट सोबत वाद झाल्याने गावातील लोक मारहाण करतील या भितीने ते त्याचेकडील चारचाकी वाहनाने मुंजलवाडी, कुसुंबा, मार्गाने लोहारा गांवाकडे भरधाव वेगाने निघुन गेले.


ते भरधाव वेगाने जात असतांना लोहारा येथे एका इसमाला त्यांचे वाहनाने धडक देत उडवून दिल्याने तो गंभीर जखमी झाला म्हणुन लोकांनी त्या गाडीचा पाठलाग करुन सदरचे वाहन हे लोहारा गावातील एका शेतामध्ये 10.30 वाजता थांबवून त्यामध्ये बसलेल्या इसमांना लोकांना लाथा बुक्कयांनी मारहाण केली आहे. सदर वेळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल व सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या व्यक्तीना लोकांच्या तावडीमधुन सोडवून सावदा पोलीस स्टेशनला आणले आहे. 

साधू असल्याची अफवा पसरवून मारहाण झालेल्या व्यक्तीनी भगव्या रंगाचे कपडे घातलेले असल्याने साधुंना मारहाण झाली असल्याचे बाबत व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते तरी सदरचे दोन्ही व्यक्ती हे जडी बुटी विक्रीचा व्यवसाय करणारे इसम असुन ते साधु नाहीत. सदर प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे सदर व्यक्तीनी अपघात केला म्हणुन त्यांचेवर अपघाताचा गुन्हा व त्यांना लोकांनी मारहाण केली म्हणुन दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर बाबत तपास चालु आहे. ज्या व्यक्तीना मारहाण झालेली आहे त्या व्यक्ती हया हरीयाना राज्यातील जडी बुटी विक्रीचा व्यवसाय करणारे इसम असुन त्यांनी भगव्या रंगाचे कपडे घातलेले असल्याने ते साधु असल्याबाबत लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. तरी सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरीकांना आवाहन करण्यात येते की कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडु नका तसेच सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हीडीओला प्रतीसाद देवु नका अशा प्रकारचे सामाजीक वातावरण बिघडवणारे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत केल्यास त्यांचेवर सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी आवाहन केले आहे

No comments