यावल तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी. (संपादक -:- हेमका...
यावल तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न.
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व यावल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन बाबतीत शुक्रवार दि.१८ रोजी दुपारी 2:30 वाजता गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रिडा शिक्षक महासंघाचे तालुका अध्यक्ष व मुख्याध्यापक के.यु.पाटील यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी दहिगाव केंद्रप्रमुख विजय रंगनाथ ठाकुर डॉ.प्रमोद मुरलीधर सोनार उपस्थित होते यावल गटशिक्षण अधिकारी हॉल येथे आयोजित या सभेत के.यु.पाटील यांनी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणे व विविध शासकीय योजना बाबत मार्गदर्शन व चर्चा केली तसेच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा शुल्क भरणे बाबत,ऑनलाईन प्रवेशिका भरणे बाबत माहिती क्रीडा संयोजक दिलीप संगेले यांनी दिली या सभेत प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी स्पर्धा तयारी करून संघ उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रप्रमुख विजय ठाकुर डॉ.प्रमोद सोनार यांनी केले तसेच यावल तालुका क्रीडा समिती व सर्व क्रीडा शिक्षक यांनी वाय, वाय पाटील समर्थ रघुनाथ बाबा विद्यालय चुचांळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला यावेळी पर्यवेक्षक के.आर.सोनवणे आर.आय.तडवी चिमणकारे सर,शे सलीम सर,शे कुरेशी शरीफ सर,शे वसीमखान सर, अबु सुफियान सर,शे अख्तर सर शे युसुफ पी.पी. महाजन,जे.ए.फिरके योगेश कोळी एन.सी.पाटील बढे सर,काळकर सर,मोरे सर प्रा बोदडे सर, ए.डी.पाटील , शे,जुबेर सर सौ.डी.डी.ठाकरे श्रीमती आर.एम.पाटील इ. सह सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
No comments