भुसावळ येथे कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कोळी विकास मंच मंडळाच्या उपक्रम भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:-हेमकांत गाय...
भुसावळ येथे कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
कोळी विकास मंच मंडळाच्या उपक्रम
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल : भुसावळ कोळी समाज विकास मंडळ मार्फत भुसावळ येथे कोळी समाजातील दहावी,बारावी, पदवी, इतर शैक्षणिक आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाज विकास मंडळाची ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी समाजातील १५० विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिलीप सूर्यवंशी होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ तायडे, अशोक सोनवणे, प्रदीप सोनवणे, सतीश सपकाळे, डॉ. दिवाकर पाटील, नारायण कोळी, शांताराम कोळी, वसंत सपकाळे, सौ.सुनंदा ताई सपकाळे, सौ.कल्पना तायडे, सौ.सुकेशिनी कोळी उपस्थित होते. दिलीप सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरण्याचे व उच्च ध्येय ठेवावे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा असे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे,चंद्रकांत सूर्यवंशी, दत्तात्रय सपकाळे, रवींद्र बाविस्कर,दीपक सोनवणे, महारु कोळी, प्रदीप सपकाळे, कैलास सोनवणे, विजय तावडे, संदीप कोळी, धर्मराज कोळी, गोकुळ सपकाळे,आनंदा दोडे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी व आभार प्रदर्शन दिपक सोनवणे यांनी केले.
No comments