adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या..!! उंब्रज पोलीसांची दमदार कामगिरी...!!

 गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या..!! उंब्रज पोलीसांची दमदार कामगिरी...!!   सौ. स्नेहल तांबोळी ( सातारा ज...

 गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपींच्या मुसक्या आवळल्या..!! उंब्रज पोलीसांची दमदार कामगिरी...!! 


 सौ. स्नेहल तांबोळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  सातारा :-  उंब्रज पोलीस ठाणेत गुन्हा रजिस्टर नंबर  70/25 प्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीं याने फिर्यादी यांचे बंद घरात प्रवेश करून चांदीचे दोन छल्ले तसेच एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरी करून नेलेबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करत असताना उंब्रज पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी संकेत संतोष चव्हाण (वय 20 )  रा. लक्ष्मीनगर उंब्रज ) याने केला असल्याबाबत माहिती मिळाल्याने संशयित आरोपींस  शिताफीने ताब्यात घेवुन आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपींने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करण्यात आलेली असून आरोपीकडूंन गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन चांदीचे छल्ले तसेच hp कंपनीचा लॅपटॉप असा 36 हजार रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

   सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाणेचे स.पो.नि. रवींद्र भोरे, पीएसआय रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार सचिन मुळे, संजय धुमाळ, दिनेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार,श्रीधर माने, मयूर थोरात, राजू कोळी यांनी केली आहे.

No comments