यावल तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध, हरकतीसाठी २१ जुलै पर्यंत मुदत भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (स...
यावल तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध, हरकतीसाठी २१ जुलै पर्यंत मुदत
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या उपस्थितीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणच्या प्रारूप रचनेला प्रसिध्दी देण्यात आली. यावल तालुक्यात पाच गट असून दहा गण आहेत. पूर्वीच्या रचनेनुसारच सदर गट आणि गण असून सोमवारी गट,गण प्रारूप रचनेला प्रसिध्दी देवुन त्यावर हरकती नोंदवण्यासाठी २१ जुलै पर्यंत ची मुदत देण्यात आली आहे. तर प्राप्त हरकातील निपटारा केल्यानंतर दिनांक १८ ऑगष्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून अंतिम जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण हे जाहीर होतील व त्यानंतर आरक्षण काढले जाणार आहे.
यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी एस. एल. पाटील, सुयोग पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तहसील कार्यालय तसेच पंचायत समितीच्या सभागृहात सदर प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पूर्वीप्रमाणेच यावल तालुक्यात पाच जिल्हा परिषद चे गट असून पंचायत समितीचे १० गण आहेत. तेव्हा या प्रारूप प्रसिद्ध गण आणि गटाच्या यादीवर दिनांक २१ जुलै पर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार आहे. प्राप्त हरकतींवर निपटारा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक १८ ऑगष्ट रोजी अंतिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची रचना प्रसिद्ध केली जाईल. व त्यानंतर आरक्षण काढले जाणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट आणि गणांची प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वर्तुळात आता हालचाली वाढल्या आहेत.
असे आहे गट व गण
भालोद- पाडळसे गट
भालोद गण :- भालोद, बोरावल बुद्रुक, निमगाव, टेंभी, सांगवी खुर्द, चिखली खुर्द, चिखली बुद्रुक, राजोरे, अट्रावल.
पाडळसे गण :- पाडळसे, कोसगाव, वनोली, अंजाळे, वाघडूद, पिळोदे बुद्रुक, कासवा, अकलूद, भोरटेक, कठोरे प्र.सावदा, दुसखेडा, वडोदे प्र.सावदा रिधूरी, करंजी
साकळी – दहिगाव गट
साकळी गण :- साकळी, वढोदे प्र.यावल, मनवेल, दगडी, पिळोदे खुर्द, थोरगव्हाण, शिरागड, पथराडे, पिंप्री, भालशिव, बोरावल खुर्द, टाकरखेडे.
दहिगाव गण :- दहिगाव, कोरपावली, महेलखेडी, नावरे, बोराडे, चुंचाळे, विरावली, शिरागड.
किनगाव – डांभुर्णी गट
किनगाव गण :- किनगाव खुर्द, किनगाव बुद्रुक, गिरडगाव, वाघोदे, नायगाव, मालोद, वाघझिरा, इचखेडे, खालकोट, रुईखेडे, मानापुरी.
डांभुर्णी गण :- डांभुर्णी, आडगाव, कासारखेडा, चिंचोली, उंटावद, डोणगाव, कोळन्हावी.
हिंगोणे – सावखेडासिम गट
हिंगोणे गण :- हिंगोणे, चितोडे, डोंगरकठोरा, बोरखेडे खुर्द, सांगवी बुद्रुक.
सावखेडासिम :- सावखेडासिम, गाड्ऱ्या, जामण्या, उसमळी, लंगडा आंबा, मोहराळे, हरिपुरा, आंबा पाणी, वड्री खुर्द, परसाडे बुद्रुक, कोळवद, सातोद.
न्हावी – मारुळ गट
न्हावी गण :- न्हावी, आमोदा, पिंपरूळ, विरोदा.
मारुळ गण :- मारूळ, चारमळी, बामणोद, बोरखेडे बुद्रुक, हंबर्डी, म्हैसवाडी.
No comments