जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक व दारु बाळगणाऱ्या १० आरोपींविरुध्द गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक व दारु बाळगणाऱ्या १० आरोपींविरुध्द गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१७):-अवैध वाळू वाहतूक व दारु बाळगणाऱ्या १० आरोपींविरुध्द विशेष पोलीस पथकाने कारवाई करुन ६१,७४,६९०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.श्री.सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेवावत आदेश दिलेले आहेत.
वरील नमुद आदेशाप्रमाणे मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे हे दि.१६/०७/२०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असतांना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हदीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करत असून आता गेल्यास मिळून येतील, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ व कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले.
वरील नमूद ठिकाणी माहेगाव देशमुख शिवार, गोदावरी नदी पात्रामध्ये विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहचले असता सदर ठिकाणी काही इसम हे गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करुन ती उपासलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डंपर व ट्रैक्टर मध्ये भरुन वाहतूक करताना दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच पथाकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले. त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करुन ०४ डंपर व ०१ ट्रैक्टर पकडून पकडलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव क्र.०१) डंपर वरील चालक अर्जुन भाऊसाहेब गुरुळे वय-३० वर्ष रा.मुर्शवपूर ता. कोपरगाव असे सांगून सदर ट्रेक्टरचा मालक मीच असल्याचे सांगितले, क्र.०२) वरील ट्रैक्टर चालकाने त्याचे नाव संतोष लक्ष्मण उमके वय-३० वर्षे रा.मुर्शदपूर ता. कोपरगाव असे सांगून मालक अर्जुन भाऊसाहेब गुरुळे रा. मुर्शदपूर ता. कोपरगाव असल्याचे सांगितले, ०३) डंपर चालकाने त्याचे नाव गणपत पंडीत पवार वय-२७ वर्षे रा. पारेगाव ता. येवला जि. नाशिक असे सांगून डंपर मालक अमोल वसंत मांडगे (फरार) रा. कोपरगाव असल्याचे सांगितले, क्र.०४) डंपर चालकाने त्याचे नाव अमोल लक्ष्मण इंगळे वय-३१ वर्ष रा.मळेगाव घडी ता. कोपरगाव परगाव असं सांगून डंपर मालक रामा कंदलाके (फरार) रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव असल्याचे सांगितले, तसेच क्र.०५) डंपरवरील पळून गेलेल्या चालक व मालकाबाबत पकडलेल्या इसमांना विचारपूस केली असता सदर डंपर चालक व मालक अजय शेळके (फरार) रा. कोपरगाव असे असल्याचे सांगितले. वरील प्रमाणे पकडलेली डंपर, ट्रॅक्टर त्यांचे चालक व मालक हे माहेगाव देशमुख ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर
येथून गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा चोरुन वाळूचा उपसा करुन ती डंपर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या वाहतूक करताना मिळून आले. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे
१) ७,१०,०००/- रुपये किं:चा, क्र.०२) निळया रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रेक्टर व ट्रॉली त्यामध्ये ०१ ब्रास वाळू, २ १२,००,०००/- रुपये किंःचा क्र.०१ चा टाटा कंपनीचा ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा डंपर, ३) १२,००,०००/- रुपये किंचा क्र०३ टाटा कंपनीचा ११२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा डंपर
४) १२,२०,०००/- रु.कि.चा क्र.०४ टाटा कंपनीचा ९९२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा डंपर त्यामध्ये ०२ ब्रास वाळू, ५) १२,२०,००० रुकि क्र०५ टाटा कंपनीना ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा डंपर त्यामध्ये ०२ ब्रास वाळू असा एकूण ५५,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे एकूण ५५,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
१) कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३(५) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे तसेच दि.१५/०७/२०२५ रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नेवासा पोलीस स्टेशन होत नेवासा खुर्द गावाकडून नेवासा फाट्याकडे एक विटकरी रंगाचा टेम्पो अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असून आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ नेवासा पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकिगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले.
वरील नमूद ठिकाणी विशेष पथकासह पोहचून मार्केट यार्ड, नेवासा खुर्द येथे सापळा लावुन थांबले असताना थोड्याच वेळात नेवासा खुर्द गावाकडून नेवासा फाट्याकडे एक विटकरी रंगाचा टेम्पो येतांना दिसला तो जवळ येताच त्यावरील चालकास पोलीस पथकाची चाहूल लागताच चालक टेम्पो जागीच सोडून पळून गेला. बातमीतील नमूद माहिती प्रमाणे सदरची गाडी विटकरी रंगाचा टाटा कंपनीचा ७०९ टेम्पो असून त्याची पंचासमक्ष बारकाईने पाहणी केली असता त्याचा नं.MH- १२ SC-७९२९ असा असून त्यामध्ये ०२ ब्रास वाळू भरलेली मिळून आली सदर ठिकाणावरुन ६,००,०००/-रु.किंमतीचा टाटा कंपनीचा ७०९ टेम्पो, ८,०००/- रुपये किमतीचा अवैध रित्या उत्खनन केलेला साठा अंदाजे ०२ ब्रास असा एकूण ६,०८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशन येथे येऊन अज्ञात टेम्पो चालकांसह ६,०८,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन खालीलप्रमाणे कायदेशीर कारवाई केली आहे.
१। नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं.६७५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ प्रमाणे
तसेच दि.१५/०७/२०२५ रोजी पावडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचडी पोलीस स्टेशन हद्दीत पागोरी पिंपळगाव गावामध्ये काही इसम अवैध दारु विक्री करत असले बाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पाचडी पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकीगत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले.नमूद ठिकाणी पागोरी पिंपळगाव ता.पावडी येथे जाऊन माहितीची खातरजमा करून वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथकाने छापे टाकून खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.
१) पागोरी पिंपळगाव गावात येडा चौकात एका टपरीच्या आडोशाला छापा टाकला त्याठिकाणी इसम नामे साईनाथ शिवदास घनवट वय ३७ वर्षे रा. पागोरी पिंपळगाव ता. पाथडी हा मिळून आल्याने त्यास पोलीस पथक असल्याचे सांगून विश्वासात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली टपरीच्या आडोशाला एकूण ९,३२५ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारुचा साठा त्याच्या ताब्यात मिळून आल्याने जप्त करुन आरोपी विरुध्द पाथड़ों पो. स्टे येथे गु.र.नं. ७७३/२०२५ मु.प्रो. अॅक्ट कलम६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
२) पागोरी पिंपळगाव गावात हॉटेल महेश मध्ये छापा टाकला त्याठिकाणी इसम नामे नवनाथ भिमराव कुटे वय-४५ वर्षे रा.पागोरी पिंपळगाव ता. पाचडी हा मिळून आल्याने त्यास पोलीस पथक असल्याचे सांगून विश्वासात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली काउंटर मध्ये एकूण ७,३६५ रुपये किमतीचा देशी विदेशी कंपनीच्या दारुचा साठा त्याच्या ताब्यात मिळून आल्याने जप्त करुन आरोपी विरुध्द पाधड़ी पो.स्टे येथे गु.र.नं.७७४/२०२५ मु.प्रो. अॅक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.वरील प्रमाणे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत ०२ ठिकाणी छापा टाकून ०२ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण १६,६९० /- रुपये किंमतीचा देशी व विदेशी दारुचा साठा जप्त करुन वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. वरील प्रमाणे दि.१५/०७/२०२५ व दि.१६/०७/२०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुका, नेवासा, पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ०४ गुन्हे दाखल करुन १० आरोपींविरुध्द कारवाई करुन ६१,७४,६९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाकचौरे सो, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग, श्री. शिरीष वमने सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक सो यांचे विशेष पथकाचे प्रभारी मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोसई/राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकों/अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेकॉ/मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ सुनिल पवार, पोकॉ/सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे, पोकॉ/संभाजी बोराडे, पोकॉ/दिपक जाधव, पोकॉ/विजय ढाकणे, पोकॉ/जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली आहे.
No comments