adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोहमांडली येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान'

 मोहमांडली येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान'  रावेर प्रतिनिधी( आदित्य गजरे ) संपादक हेमकांत गायकवाड  रावेर तालुक्य...

 मोहमांडली येथे 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान'



 रावेर प्रतिनिधी( आदित्य गजरे )

संपादक हेमकांत गायकवाड 

रावेर तालुक्यातील मोहमांडली येथील माध्यमिक आश्रमशाळेत 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियान' अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ८८९ विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर ३५० बालकांची व ग्रामस्थांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार बंडू (बी. ए.) कापसे यांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिरात खालील प्रमाणे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलेः कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार बंडू (बी. ए.) कापसे यांच्या हस्ते वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या शिबिरात खालील प्रमाणे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलेः

जात प्रमाणपत्र - २००

अधिवास दाखले - २२०

राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (नॅशनलिटी) - २२०

उत्पन्न प्रमाणपत्र - १५५

जन्म प्रमाणपत्र - २५

आयुष्यमान भारत कार्ड – २०

पीएम किसान योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणे  ४ 

प्रलंबित रेशन कार्ड नोंदणी - ४

आधार कार्ड दुरुस्ती - ४५

प्रमाणपत्रांचे वितरण वनपाल राठोड मॅडम, पुरवठा अधिकारी शिरेकर, सहाय्यक कृषी अधिकारी देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या टीमने ३५० बालकांशी सह ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळ अधिकारी निलेश धांडे, तलाठी, ग्रामसेवक शिरीन तडवी, आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक, आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामुळे आदिवासी समाजातील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

No comments