दिल्लीगेट परिसरात डंपरने चिरडले;एकाचा जागीच मृत्यू सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.१७):-अहिल्यानगर शहराती...
दिल्लीगेट परिसरात डंपरने चिरडले;एकाचा जागीच मृत्यू
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१७):-अहिल्यानगर शहरातील दिल्लीगेट परिसरात अवजड वाहतूक करणाऱ्या डंपरने एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (ता.16) रोजी सकाळी घडली आहे.अवजड वाहतुकीने आठवड्याभरात दुसरा बळी घेतला असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अहिल्यानगर शहरात दिवसाही अवजड वाहतूक सुरू आहे.मागील आठवड्यात एका महिलेचा अवजड वाहतुकीमुळे मृत्यू झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ही वाहतूक थांबवण्याची मागणी केली होती. तरीही वाहतूक सुरू होती.आज सकाळी प्रशांत औसरकर (मूळ रा.मिरजगाव, ता.कर्जत,सध्या रा.सारसनगर, अहिल्यानगर) याला दिल्लीगेट परिसरात डंपरने धडक दिली.या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला.
No comments