adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे मंचर येथे महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीबद्दल आंदोलन.

 युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे मंचर  येथे महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीबद्दल आंदोलन. पुणे प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पुणे ...

 युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे मंचर  येथे महिला पत्रकाराला झालेल्या मारहाणीबद्दल आंदोलन.


पुणे प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे मंचर (पुणे):आज दिनांक 15जुलै 2025 रोजी मंचर येथे महिला पत्रकार स्नेहा बारवे ह्या व्रत्तांकन करत असताना काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी त्यांना अमानुष मारहाण केली असता त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मंचर पोलिसांनी मोकाट सोडून साधा गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने आज मंचर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने व इतर संघटनाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाची सुरुवात  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली व मंचर शहरातून मोर्चा घेऊन पोलीस स्टेशनं येथे जाऊन निवेदन देण्यात आले.या आंदोलनामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री.गणेश महाडिक पश्चिम, श्रीमती.जयश्री घोडके महिला राज्य उपाध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री.संतोष लांडे, पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख श्री.कांताभाऊ राठोड ,पुणे जिल्हा महिला सचिव श्रीमती अनघलक्ष्मी दुर्गा ,पुणे शहर अध्यक्ष श्री.रितेश सनस, खेड तालुका अध्यक्ष श्री.हंसराज पाटील यांच्या उपस्थितीत व आंबेगाव तालुक्यातील अनेक पत्रकार राजकीय आंदोलनात सहभागी होते मंचर शिवाजी महाराज चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत हा मोर्चा शांततेत घेण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या व मुलाखती घेऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडून ग्वाही घेण्यात आली की लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून कारवाई करण्यात येईल 

इथून पुढे अशा प्रकारच्या कुठल्याही पत्रकारांवर अन्याय झाला तर तो सहन केला जाणार नाही असा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने खडसावुन सांगण्यात आले व शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी यासाठी  निवेदन देण्यात आले.

No comments