निलेश राणे यांना सर्व शासकीय कार्यालयात दोन महिन्यासाठी प्रवेश बंदी जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी इदू पिंजारी फैजपूर /भरत कोळी यावल ता.प्र....
निलेश राणे यांना सर्व शासकीय कार्यालयात दोन महिन्यासाठी प्रवेश बंदी जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी
इदू पिंजारी फैजपूर /भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांना १९ जुलै ते १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत यावल व रावेर तालुक्यांतील तसेच जळगाव शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आला आहे.
१६ जुलै रोजी फैजपूर प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या दालनात राणे यांनी कथितरित्या असभ्य वर्तन केल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याआधी १५ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात त्यांनी चुकीच्या प्रकारे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महसूल कर्मचारी संघटनांनी या प्रकारांचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या आदेशानुसार, बंदी कालावधीत राणे ऑनलाइन तक्रारी दाखल करू शकतात आणि सुनावणीसाठी दूरध्वनी प्रणालीचा वापर करू शकतात. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना एक तासाची सवलत देण्यात येईल.असे प्रभारी अपर जिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी पत्रकाद्वारे आदेश जारी केले आहे.
No comments