adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साताऱ्यात दशनाम गोसावी समाजाच्या महिलांकडून पेंढ्याच्या भैरोबा येथे वृक्षारोपण...!! जिल्हाध्यक्षांनी मानले आभार...!!

 साताऱ्यात दशनाम गोसावी समाजाच्या महिलांकडून पेंढ्याच्या भैरोबा येथे वृक्षारोपण...!! जिल्हाध्यक्षांनी मानले आभार...!! सौ. कलावती गवळी ( सात...

 साताऱ्यात दशनाम गोसावी समाजाच्या महिलांकडून पेंढ्याच्या भैरोबा येथे वृक्षारोपण...!! जिल्हाध्यक्षांनी मानले आभार...!!


सौ. कलावती गवळी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा शहरांच्या पश्चिमेस बाजूस पैंढ्याचा भैरोबा हे प्रसिद्ध डोंगर म्हणून ओळखले जाते. आणि याच ठिकाणी गडकर आळी आणि शाहूपुरी ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणून पेंढ्याचा भैरोबा जागृत देवस्थान अशी या देवस्थान डोंगरांची ओळख आहे. याच मंदिराभोवतीचा परिसर व रस्त्याच्या बाजूच्या परिसरांचा विकास करण्याचे काम सध्या शासनाकडून मागील वर्षापासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात येते. त्याच अनुषंगाने गोसावी समाजातील महिला मंडळाकडून भैरोबा डोंगरांवर व भोवतीच्या परिसरांमध्ये झाडे लावण्याचा संकल्प सातारा जिल्ह्याचे दशनाम गोसावी समाजाचे जिल्हा अदक्षय मा. जगन्नाथ गिरी गोसावी उर्फ ( तात्या ) यांनी मांडला होता. महिला मंडळातर्फे रस्त्याच्या बाजूस व पठारांवर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष गिरीगोसावी पुढे म्हणाले... सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये. पुढील पिढीस चांगला ऑक्सिजन मिळण्याकरिता सामाजिक बांधिलकीतून वृक्षाचे रोपण होणे आवश्यक आहे. सध्या ज्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्याच प्रमाणात वृक्ष लागवड होत नाही. शासन व सामाजिक संस्था वृक्षारोपांचे कार्यक्रम राबवून वृक्ष लागवड करीत आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ.मा. सुजाता गिरी गोसावी मीना गिरी गोसावी उषा गोसावी सुविधा गिरी गोसावी ममता गिरी गोसावी प्रिया गोसावी स्वाती गोसावी मीना भारती आदी महिलांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सातारा जिल्हा दशनाम गोसावी समाजाचे जिल्हा अध्यक्ष मा. जगन्नाथ गिरी गोसावी आणि मा. प्रकाश गिरी गोसावी यांनी या उपक्रमांतील महिलांचे आभार मानले, सातारा जिल्ह्यातील दशनाम समाज कमिटी समाजासाठी नेहमीच प्रयत्नशील दिसून येते.

No comments