adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्तव्यदक्ष महिला पोलीस प्रमिला निकम राजगड पोलीस स्टेशन यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!!

  कर्तव्यदक्ष महिला पोलीस प्रमिला निकम राजगड पोलीस स्टेशन यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!!  संभाजी पुरी गोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी...

 कर्तव्यदक्ष महिला पोलीस प्रमिला निकम राजगड पोलीस स्टेशन यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..!! 


संभाजी पुरी गोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महिला पोलीस हवालदार राजगड पोलीस स्टेशन. 

(फसव्या लोन ॲप पासून सावधान)

  आजकाल अनेक फसव्या अप्समुळे लोकांची चांगलीच फसवणूक होत असल्याचे दिसून येत. त्यामुळे अशा ॲप्सपासून नागरिकांनी सावध  आणि सतर्क राहणेचे गरजेचे आहे. असे आवाहन महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम राजगड पोलीस स्टेशन यांनी केले आहे. सध्या सायबर गुन्हेगार हे सध्या फसव्या ॲपच्या माध्यमांतून आपला वैयक्तिक डेटा कॉन्टॅक्ट नंबर व पैसे लुबाडतात,असे प्रकार सध्या सर्रास घडताना दिसत आहेत. आणि आजकाल या सायबर फ्रॉडच्या माध्यमांतून लाखो करोडोंचा गंडा घालण्यात हे सायबर फ्रॉड यशस्वी होतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललेले आहे. अतिशय चांगले हुद्द्यावरील लोक देखील याला बळी पडताना दिसून येतात. म्हणूनच सायबर फ्रॉडच्या संदर्भात वारंवार घटना घडताना दिसत आहेत.

(कसे फसवले जाते)....

• आपली आर्थिक क्षमता न तपासता आपल्याला मोठ्या रकमेच्या लोणची ऑफर दिली जाते. 

• एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यात बद्दल सांगितले जाते.

•त्यानंतर आपल्या मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर,फोटो मध्ये ॲक्सेस मागितला जातो.

• मिळालेल्या लोनला भयंकर व्याजदर तसेच छुपे कर आकारले जातात.

• लोन चे पैसे भयंकर व्याजासह परत मिळवण्यासाठी तुमचे मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर ला तुमचे फोटो मॉर्फ करून ते अश्लील बनवून पाठवले जातात. 

•धमकीचे ऑडिओ कॉल केले जातात. 

(काय दक्षता घ्यावी).....

•अशाप्रकारे कोणतेही कर्जासंबंधी ॲप डाऊनलोड करताना गुगल प्ले स्टोअर  किंवा एप्पल स्टोअर मधूनच डाउनलोड करावे.

• अनोळखी लिंक वर कधीही क्लिक करू नये.

•कर्ज देणारी संस्था ही आरबीआय च्या लिस्ट मध्ये आहे का ते तपासून पाहावे.

• सदर ॲपमध्ये पॅन, आधार, ओटीपी मागणी केली जाते. असे कोणतेही कागदपत्र ओटीपी पुरवू नये.

•जर अशा फसवणुकीला कोणी बळी पडले तर

 Cybercrime. gov. in या साइटवर जावुन तक्रार करावी. किंवा 1930 या नंबरचे हेल्पलाइन वर कॉल करून माहिती द्यावी.

आपला डेटा ही आपली संपत्ती आहे. फसवणूक करणाऱ्यांना चोरण्याची संधी देऊ नका.....

No comments