निरपराधांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेली शहरातील जड वाहतूक कोणाच्या आशिर्वादामुळे ? अपघातात निष्पापांचे बळी घेणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच...
निरपराधांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेली शहरातील जड वाहतूक कोणाच्या आशिर्वादामुळे ?
अपघातात निष्पापांचे बळी घेणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचा समाजवादी पार्टी तर्फे जाहीर निषेध; मयतांच्या कुटुंबियांना शासनाने २५ लाख रुपयांची नुकसान भरपाईची द्यावी - समाजवादी ची मागणी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर शहरातील वाहतूक समस्या आज पर्यंत सुटलीच नाही, पूर्वी उड्डाणपूल व बाह्य वळण रस्ता नसल्यामुळे शहरात दररोजच अपघात होत आहेत. त्यात कित्येक निर्पराधांचे बळी गेले, परंतु आता शहरात उडाणपूल तसेच बाह्य वळण रस्ता असूनही बिनदिक्कतपणे शहरातून जड वाहतूक सुरु आहे तथा अपघात घडून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. मागील आठ दिवसांपूर्वीच तारकपूर याठिकाणी अपघातात एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. परंतु संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांनी याची कोणतीच दखल घेतली नाही तसेच आज दिल्लीगेट येथे पुन्हा प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे अपघातात एका निष्पाप तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. यास बेजबाबदार वाहतूक प्रशासन आणी संबंधित महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असून त्या सर्वांचे समाजवादी पार्टी तर्फे धिक्कार आणी तीव्र निषेध करीत आहोत. व अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना रुपये २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी तसेच अपघातात आणखी कोण्या निरपराधाच्या बळीची वाट ना पाहता नगर शहरातून होत असलेली जड वाहतूकीला त्वरित बंदी घालावी. अन्यथा नगरकरांच्या सुरक्षतेसाठी समाजवादी पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे अशयाचे निवेदन समाजवादी पार्टी चे नगर शहरजिल्हा अध्यक्ष आबिद हुसैन यांनी जिल्हाधिकारी अ.नगर यांना दिले आहे.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments