adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिव्यांग फाउंडेशनच्या रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाला यश.. रस्ता दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याबरोबरच डिसेंबरअखेरपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याचे ग्रा.पं.च्या वतीने दिले लेखी पत्र

 दिव्यांग फाउंडेशनच्या रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाला यश.. रस्ता दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याबरोबरच डिसेंबरअखेरपर्यंत रस्ता डा...

 दिव्यांग फाउंडेशनच्या रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या अर्धनग्न आंदोलनाला यश..

रस्ता दुरुस्तीसाठी मुरूम टाकण्याबरोबरच डिसेंबरअखेरपर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याचे ग्रा.पं.च्या वतीने दिले लेखी पत्र 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : - मलकापूर ग्रामीण ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या बन्सीलाल नगरच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने दिव्यांग मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी १५ जुलै रोजी रस्त्यावरच खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलन करीत ग्रा.पं.प्रशासनाचा निषेध नोंदविला. सदर आंदोलनाची दखल घेत तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्याचे व डिसेंबर २०२५ अखेर डांबरी रस्ता करण्याचे लेखी आश्वासन ग्रा.पं.प्रशासक व ग्रामसेवक यांनी उपोषणकर्त्यांना दिले.


बन्सीलाल नगरच्या मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सदर रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी दिव्यांग फाऊंडेशनचे निलेश बाळू चोपडे यांनी एका निवेदनाद्वारे केली होती. तर रस्त्याचे काम न झाल्यास १५ जुलै पासून अर्धनग्न आंदोलनाचा इशाराही दिला होता. वेळोवेळी निवेदने व विविध आंदोलने करूनही ग्रा. पं. प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर आज दिव्यांग फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी रस्त्यावरच खड्ड्यात बसून अर्धनग्न आंदोलनास सुरूवात केली. तसेच ग्रा.पं.च्या ढिसाळ कारभारा विरोधात घोषणाबाजी करून गलथान कारभाराचा निषेध नोंदविला. त्यानंतर ग्रा.पं. प्रशासनाची एकच धांदल उडाली व ग्रा.पं. प्रशासक व ग्रा.पं. ग्रामसेवक यांनी तात्काळ आंदोलनस्थळी येवून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

यावेळी ग्रामपंचायतचे प्रशासक व ग्रामसेवक यांनी यांनी दिव्यांग फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी सदर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात आठ दिवसात मुरूम टाकण्यात येईल, तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत बन्सीलाल नगरच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांना होणार्‍या त्रासाला पाहता दिव्यांग फाऊंडेशनने केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून नागरिकांनी सुध्दा फाऊंडेशनच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी बन्सीलाल नगर मधील जेष्ठ समाजसेवक शेषराव सोनुने काका, प्रहार जनशक्तीचे उपजिल्हाप्रमुख अजय टप, मनसेचे शहर प्रमुख गणेश ठाकूर, शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे, दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे, फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंकज मोरे, निलेश अढाव, अंकित नेमाडे, महादेव भगत, संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र जंगले, रहेमान टेलर यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील अनेक जण उपस्थित होते.

----------------------------------------------------

बन्सीलाल नगरमधील नागरिकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे होणारा त्रास पाहता दिव्यांग फाऊंडेशनने आंदोलनाचा पवित्रा घेतला. तर या आंदोलनामुळे आपले पितळ उघडे पडेल या भीतीने व याबाबत या संघटनेला कोणतेही श्रेय जावू नये याकरीता काही माजी सदस्यांनी आपण स्वखर्चानें मुरूम टाकल्याच्या वल्गना करण्याचा प्रकार समोर आला आहे. जनसेवा सोडून व जनतेची कामे करणे सोडून राजकारण आणण्याचा केविलवाना प्रयत्न झाल्याची चर्चा या दरम्यान सुरू होती. मात्र सुज्ञ व तर्कशील मतदार त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही, हा सुध्दा सूर त्यावेळी दिसून येत होता.

-------------------------------------------------------

No comments