नांदगाव कोहोळी परीसरात चारसुत्री भात लागवडीकडे शेतकरी वळाले प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर...
प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी बहुल पश्चिम पट्ट्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात भात लागवडीची लगबग चालु असुन जवळपास आजमितीला ४० ते ५०% भात लागवडी पुर्ण झाल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात मे व जून महिन्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे काही प्रमाणात भात रोपे खराब होवून पुनर्लागवडीसाठी भात रोपांचा तुटवडा पडू नये याकरिता आपत्कालीन व्यवस्थापन व पारंपारीक भात शेतीला छेद देवून शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त एस. आर. टी. व चारसुत्री भात लागवड करावी. असे आवाहन खरीप हंगामपूर्व कार्यशाळांमध्ये तालुका कृषि अधिकारी गणेश बांबळे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मंडल कृषि अधिकारी आर. एन. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे नांदगांव को. येथे सहाय्यक कृषि अधिकारी सुनिता जाधव यांनी विविध मोहिमांव्दारे शेतकऱ्यांना चारसुत्री भात लागवडीचे महत्त्व पटवून देत व प्रत्यक्ष शेतावर भात लागवडींमध्ये सहभागी होत मोठ्या प्रमाणात चारसुत्री भात लागवडीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला आहे.
पेंढयातीला पालांश व सिलीकॉनचा फेरवापर, गिरीपुष्प हिरव्या पालाचा खत म्हणून वापर, भात रोपांची नियंत्रीत लागवड १५ बाय २५ सेंमी( हेक्टरी २.६६ लाख रोपे), युरिया डिएपी ब्रिकेट खताचा वापर यामुळे हेक्टरी 30 ते ४०% उत्पादनात वाढ होते
कृषि विभागाच्या विविध मोहिमामुळे परिसरातील शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.
No comments