चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) अह...
चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी अखेर जेरबंद.. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१९):- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत आरोपींकडून 5 लाख 35,000/रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.16 जुलै 2025 रोजी रात्रीच्या सुमारास यातील फिर्यादी अरूण जगन्नाथ गंगावणे (वय 48, रा.महालक्ष्मी हिवरे ता.नेवासा, जि.अहिल्यानगर) हे घरी जाण्यासाठी घोडेगाव, ता.नेवासा येथे वाहनाची वाट पाहत थांबले असताना यातील अज्ञात आरोपीतांनी त्यांना प्रवाशी म्हणुन कारमध्ये बसवून, फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून त्यांचे कडील रोख रक्कम, मोबाईल जबरीने काढुन घेतले.याबाबत सोनई पोलीस स्टेशन येथे गुरनं 269/2025 बीएनएस 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नमूद गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा विश्वास रमेश पंडीत, रा.भावी निमगाव,ता.शेवगाव याने त्याचे साथीदारांसह मिळून केला.तसेच त्यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांक एमएच-12-एनएक्स-2406 वापरले असून ते वांबोरी येथून अहिल्यानगरकडे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष वांबोरी फाटयाजवळ संशयीत कारचा शोध घेऊन,संशयीत कार मिळून आल्याने कार थांबूवन विश्वास रमेश पंडीत,रोहन बाळासाहेब मोरे,संदेश अनिल पेटारे,सोपान पांडुरंग वाबळे सर्व रा.भावी निमगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे कडील हुंडाई कार क्रमांक एमएच-12-एनएक्स-2406 हिच्यामधुन त्याचा आणखी साथीदार दिपक आहेर,पुर्ण नाव माहित नाही रा.मजले शहर, ता.शेवगाव,जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह घोडेगाव येथून एक इसमाला चांदा येथे सोडण्यासाठी प्रवाशी म्हणुन बसून त्यास चाकुचा धाक दाखवून त्याचे कडील रोख रक्कम व मोबाईल काढुन घेतल्याची माहिती सांगीतली.
पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 5,35,000/- रू किंमत त्यात हुंडाई कंपनीची एसेंट कार व 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूर,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे,संदीप पवार,गणेश लोंढे,गणेश धोत्रे, शाहीद शेख,संदीप दरंदले, फुरकान शेख,अशोक लिपणे, प्रमोद जाधव,प्रशांत राठोड, मयुर गायकवाड वरील यांनी केलेली आहे.
No comments