adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाभिक समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त सत्कार सोहळा उत्साहात साजरा होणार! शिरपूर प्रतिनिधी

  नाभिक समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त सत्कार सोहळा उत्साहात साजरा होणार!  शिरपूर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर:-ऑ...

 नाभिक समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्त सत्कार सोहळा उत्साहात साजरा होणार! 


शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)


शिरपूर:-ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्ट (नई दिल्ली), महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा, महाराष्ट्र नाभिक महामंडळ कर्मचारी संघटना (शिरपूर तालुका) आणि जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा शनिवार, दि. 26 जुलै 2025 रोजी शिरपूर येथील शकुंतला लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पाचवीपासून पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत उत्तम यश मिळवलेल्या नाभिक समाजातील विद्यार्थ्यांचा सार्वजनिक सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आपल्या कार्यकाळात निष्ठेने सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या वेळी ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्लीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एस. ठाकूर साहेब हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच ऑल इंडिया सैनजी महासंघ ट्रस्टचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष श्री. मनोहर खोंडे हे उपस्थित राहून स्वखर्चाने विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करणार आहेत.

      या उपक्रमामध्ये सामाजिक एकात्मतेचे भान राखत नव्या पिढीला प्रोत्साहन देणे व समाजसेवकांना मानाचा मुजरा करणे, हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिरपूर तालुक्याचे नाव राज्यातच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेश या शेजारील राज्यांपर्यंत पोहोचवणारा नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. सदर कार्यक्रमास नाभिक समाजातील सर्व पालक, विद्यार्थी आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे आणि सत्कारमूर्तींना शुभेच्छा द्याव्यात, अशी आग्रही विनंती आयोजक रामविकास व सर्व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.

No comments