adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रेल्वे भुयारी मार्ग,रस्ता डांबरीकरण,सोलर वीज खांबांसाठी खासदार निधी मिळावा रियाजखान पठाण यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 रेल्वे भुयारी मार्ग,रस्ता डांबरीकरण,सोलर वीज खांबांसाठी खासदार निधी मिळावा  रियाजखान पठाण यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वार...

 रेल्वे भुयारी मार्ग,रस्ता डांबरीकरण,सोलर वीज खांबांसाठी खासदार निधी मिळावा

 रियाजखान पठाण यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर येथील नगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २ गुलशन चौक ते वॉर्ड क्रमांक ४ बाल सुधार गृह (रिमांड होम) पर्येंत संगमनेर रोड ला जोडणारा रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल या प्रस्तावीत कामाची पाहणी करताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रेल्वे पुणे विभागाचे मुख्य अभियंता देवेंद्र कुमार यांच्या समवेत श्रीरामपूर शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, नगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी उप सभापती तथा हजरत सय्यदबाबा ऊर्स कमिटी चे अध्यक्ष रियाज खान पठाण, शाहरुख (बाबा) शेख आदि मान्यवर उपस्थित होते.


यावेळी रियाज खान पठाण यांनी खा.वाकचौरे यांचे कडे वॉर्ड क्र.२ गुलशन चौक ते वॉर्ड क्र. ४ बाल सुधार गृहापर्येंत संगमनेर रोड ला जोडणारा रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल तसेच वॉर्ड क्रमांक २ मधील मौलाना आझाद चौक ते बजरंग चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण आणी प्रभाग क्र. १० व ११ मध्ये २५ ते ३० सोलर लाईट खांबे आदि विकास कामांसाठी खासदार निधी मिळावा अशा मागणीचे निवेदन त्यांना दिले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रियाजखान हबीबखान पठाण हे पुर्वीपासून कॉंगेसचे खंदे समर्थक आणी विश्वासू तथा एकनिष्ठ कार्यकर्ते असून आजवर त्यांनी प्रभागासह शहरातील विविध विकासकामांना मार्गी लावण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे, आपल्या राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणी शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान असुन तळागळातील उपेक्षित आणि दुर्लक्षीतांचे ज्वलंत प्रश्न यासोबतच जनसामान्यांचा विविध नागरी समस्यांचे निवारण यावर त्यांचे कटाक्षाने लक्ष असते, 



      मात्र दिवसेंदिवस शहराचा विकास होत असताना नवनव्या समस्या देखील निर्माण होत आहेत पैकी गुलशन चौक ते संगमनेर रोड पर्यंत रेल्वे अंडरग्राऊंड पुल होणे खुपच आवश्यक तथा गरजेचे आहे,

कारण या रस्त्यावर नेहमीच ये - जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते, परिसरातील जनसामान्य नागरीक आणी शालेय विद्यार्थी याच रस्त्याने ये - जा करतात त्यात शुक्रवार हा आठवड्याचा बाजार असल्याने वॉर्ड क्रमांक २ तसेत मिल्लतनगर, रामनगर, आदी उपनगरातील नागरीकांना देखील शुक्रवार आठवडे बाजारात जाण्यासाठी याच रस्त्याने ये - जा करणे सोयीचे ठरते.

मात्र याठिकाणी रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल नसल्याने नागरीकांना रेल्वे रुळ ओलांडून ये - जा करावी लागते हे मोठे धोकादायक असल्याने कित्येकदा याठिकाणी अपघातात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

शिवाय हा पुल झाल्यास सय्यद बाबा चौक रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुलावरील वाहतूकीचे प्रमाणे देखील कमी होवून वाढत्या रहदारी आणी वर्दळीचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकेल, करीता गुलशन चौक याठिकाणी रेल्वे अंडरग्राऊंड पुल होणे खुपच महत्वाचे तथा आवश्यक आहे.

तसेच वॉर्ड क्र.२ मौलाना आझाद चौक ते बजरंग चौक या प्रभाग क्र.१० व ११ मधील वॉर्ड क्र.२ चा मुख्य रस्ता समजला जाणाऱ्या रस्त्यावर गत १५ ते २० वर्षांपासून कोणतीच कामे झालेली नसल्याने या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत, या रस्त्यावर वाहन चालकांसोबत पादचाऱ्यांनाही अक्षरशः जीव मुठीत धरुन या रस्त्याने चालावे लागते, त्यात वीजेचा सततचा लपंडाव हा नेहमीच्या त्रासाचा विषय ठरल्याने प्रभाग क्र.१० व ११ मध्ये किमान २५ ते ३० सोलर लाईट खांबांची अत्यंत आवश्यक्ता असल्याने खासदार निधीद्वारे सदरील विकासकामांना तात्काळ निधी मिळावा अशी मागणीही रियाज खान पठाण यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments