चोपडा आगारास विठुराया पावला पंढरपुर यात्रे दरम्यान चोपडा आगारास १२ लाखांचा नफा चोपडा( प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आषाढी पंढरप...
चोपडा आगारास विठुराया पावला पंढरपुर यात्रे दरम्यान चोपडा आगारास १२ लाखांचा नफा
चोपडा( प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आषाढी पंढरपुर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन दिनांक १ जुलै ते १० जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या यात चोपडा आगाराला जवळपास ३० लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.यात्रे दरम्यान आगारातुन एकुण ३८ वाहने ७६ फेर्या,३८५७० किलोमीटर करून विना सवलत १११४५४० व सवलतीसह २९५०४६१ उत्पन्न मिळाले.उत्पन्न प्रती कि मी विना सवलत २८.८९,सवलतीसह उत्पन्न प्रती कि मी ७६.४९,सवलतीसह भारमान १०३.७९ एकुण ५९९८ प्रवासी नी प्रवास केला यामुळे आगारास सवलतीसह १२,००,००० नफा झाला अशी माहीती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली.चोपडा आगारास विक्रमी उत्पन्न मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणारे चालक,वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचार्यांचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व आभार मानले. व भविष्यात देखील असेच उत्कृष्ट कामगिरीचे सातत्य टिकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments