📰 भोर तालुक्यांत 'रोखठोक महाराष्ट्र ग्रुप'च्या पत्रकारितेची दणदणीत चर्चा..!! ✍️ सौ. स्नेहल तांबोळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. (संपाद...
📰 भोर तालुक्यांत 'रोखठोक महाराष्ट्र ग्रुप'च्या पत्रकारितेची दणदणीत चर्चा..!!
✍️ सौ. स्नेहल तांबोळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भोर तालुका व परिसरांत सध्या सर्वत्र चर्चा आहे ती "रोखठोक महाराष्ट्र ग्रुप" या डिजिटल माध्यमाची, ज्याच्या ठाम पत्रकारितेने प्रशासनालाही जागं केलं आहे.सातारा जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार संभाजी पुरी गोसावी, भोर तालुक्याचे आवाज मंगेश पवार, आणि पुण्यातील तेजस्वी पत्रकार संतोष लांडे यांनी आपल्या बिनधास्त आणि मुद्देसूद पत्रकारितेने समाजात विश्वास निर्माण केला आहे.'बिनधास्त बोलणं, खऱ्या प्रश्नांना भिडणं आणि प्रशासनाला जबाबदार ठेऊन लोकांच्या अडचणींना वाचा फोडणं — हाच रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचा आत्मा आहे”, अशी भावना गावागावांतून व्यक्त होत आहे.
मंगेश पवार – भोर तालुक्यांतील सडेतोड आणि अभ्यासू पत्रकार मंगेश पवार, हे भोर तालुक्यांतील सारोळे गावचे सुपुत्र, आणि पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज चे संपादक आहेत.
त्यांनी अनेक वेळा स्थानिक प्रश्न, ग्रामपंचायत कारभारातील त्रुटी, आरोग्य, पाणी समस्या, शैक्षणिक व महसूल विषयक मुद्द्यांवर थेट, अभ्यासपूर्ण आणि लोकाभिमुख पत्रकारिता केली आहे.
त्यांची पत्रकारिता ही संवेदनशीलता, स्पष्टता आणि सामाजिक बांधिलकीने भारलेली असून, प्रशासन आणि जनतेत पुलाचं काम करणारा खरा आवाज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
संभाजी पुरी गोसावी साताऱ्याचा निर्भीड आवाज
संभाजी पुरी गोसावी, हे करंजखोप (ता. कोरेगांव जि. सातारा ) गावचे रहिवासी, यांनी सातारा जिल्ह्यातील पोलीस व महसूल प्रशासनात आपली ओळख सत्याला भिडणारा पत्रकार म्हणून निर्माण केली आहे.
त्यांच्या बातम्यांमुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत.
वास्तव तपासून मांडलेली त्यांची भूमिका ही नव्या पत्रकारितेचा आदर्श ठरत आहे.
संतोष लांडे – पुण्यातील तरुण आणि अभ्यासू पत्रकार
संतोष लांडे, हे पुणे शहरांतील सक्रिय, तळमळीने काम करणारे तरुण पत्रकार आहेत.
त्यांनी नागरिक समस्या, ट्राफिक यंत्रणा, झोपडपट्ट्यांतील अडचणी, शहरी गरिबांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण बातम्या केल्या आहेत.
त्यांची पत्रकारिता निष्पक्ष, विवेकी आणि समाजाभिमुख असून, शहरी भागातील आवाज म्हणून त्यांची लोकप्रियता वाढत आहे. रोखठोक महाराष्ट्र ग्रुप ही केवळ एक माध्यम संस्था नाही, तर सामान्यांच्या न्यायासाठी लढणारी सशक्त पत्रकार संघटना आहे.
या ग्रुपमधील प्रत्येक पत्रकार – मग तो गावातील असो की शहरातील – प्रामाणिकपणे, निर्भीडपणे आणि जबाबदारीने पत्रकारितेची भूमिका बजावत आहे.
No comments