हिस्सार गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा भारतीय वाल्मिकी संघटनेच्या वतीने निषेध - तालेवर गोहेर दोषींवर कडक कारवाई करण्याची भार...
हिस्सार गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा भारतीय वाल्मिकी संघटनेच्या वतीने निषेध - तालेवर गोहेर
दोषींवर कडक कारवाई करण्याची भारतीय वाल्मिक संघटनेची मागणी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)
हिस्सार येथील गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अहिल्यानगर येथील वाल्मिकी समाजाच्या वतीने व भारतीय वाल्मिकी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,
दिनांक ७ जुलै २०२५ च्या रात्री हिस्सारमध्ये एक वाल्मिकी कुटुंब एका मुलाचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी एसएचओ आणि चौकीचे इतर कर्मचारी दारू पिऊन आले आणि त्यांनी कोणतीही माहिती न देता संपूर्ण कुटुंबाला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे १६ वर्षीय मुलागा गणेश वाल्मिकी याचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाच्या कुटुंबातील भावाचीही प्रकृती गंभीर आहे. वडीलही तितकेच जखमी आहेत.आई, बहीण आणि घरातील सर्व महिलांवर अत्याचार करण्यात आला. एसएचओ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनाही मारहाण केली. तरीही गेल्या दहा दिवसांपासून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत मुलाचे अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. आम्ही अहिल्या नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत सरकारला विनंती करतो की त्यांनी दोषी लोकांवर कारवाई करावी आणि वाल्मिकी समाजाला न्याय द्यावा. जर यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी संपावर जाऊ, आम्ही साफसफाई थांबवू, हे किती दिवस चालेल हे माहित नाही. सदर कर्मचाऱ्याला अॅट्रॉसिटी कायदा दाखल करून निलंबित करा आणि शिक्षा करा. त्याला कामावर ठेवू नका, अशी मागणी भारतीय वाल्मिकी संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवर गोहेर व समस्त वाल्मिकी समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडे न्यायाची याचना करत ,अन्याय करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा कराल.अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रसंगी भारतीय वाल्मिकी संघटनचे राष्ट्राध्यक्ष तालेवर सेवकराम गोहेर,अमोल छजलाने, नरेश चव्हाण, राधेलाल नकवाल,आकाश कुडिया,अनिल तेजी, रवी मोरलरोशे, पत्रकार जहीर सय्यद, किशोर भगवाने, अनिल वाणे, नितेश निंदाने, राजेश बहोत, धीरज छजलाने, अर्जुन शेरगिल, सुरज झंगारे, ओंकार बनसोडे, सुर्दशन गोहेर, विक्रम चव्हाण सर, दीपक नकवाल, अनिल चंडाले, अशोक वाल्मिकी, गुलाबजी गोहेर,सोनु गोहेर,तुषार गोहेर आदी उपस्थित होते.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments