आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची यावल प्रकल्प कार्यालयावर धडक विविध मागण्यासह अनेक समस्यांवर चर्चा केली तसेच रानभाज्या महोत्सवात सहभागी ...
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची यावल प्रकल्प कार्यालयावर धडक
विविध मागण्यासह अनेक समस्यांवर चर्चा केली तसेच रानभाज्या महोत्सवात सहभागी
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेने यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक दिली व विविध विषयांवर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे बाबतीत प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी माहुरे साहेब यांना आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी सह संघटनेचे मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला
आसेमं ने केलेल्या प्रमुख मागण्यांत
1) आदिवासी बांधवांना स्वतंत्र आदिवासी धर्म कोड लागु करावा.शासनाने आदिवासी धर्म कोड लागु केल्यास धर्मांनतराचा मुद्दा संपुष्टात येईल.
2) जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुटीची मागणी करावी.
3) आदिवासी करीता असलेला निधी संपूर्ण आदिवासी योजनांवरच खर्च व्हावा.
4) न्युक्लिअस बजेट अंतर्गत योजना फार्म वारंवार मागवू नये. तसेच योजना प्रभावीपणे राबवावी
5) शबरी घरकुल योजना ही प्रभावी पणे राबवावी.
6) आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती विहीत वेळेत वाटप करण्यात यावी व दारिद्रय रेषा, पिवळे कार्ड असलेल्यांना उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करावी. देय रक्कम वाढवून मिळावी. 2-4-6 हजार रूपये याप्रमाणे टप्पे करावेत.व विद्यार्थी माहिती 31जुलै अखेर मागवावी.
7) शबरी महामंडळ तर्फे आदिवासी बांधवांना खावटी कर्ज वाटप योजना राबविण्यात यावी.
8) आदिवासी शेतकरी बांधवांसाठी शेती पुरक व उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी
9) डि.बी.टी अर्थ सहाय्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे.
10) एका.आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे यावल येथेच असावे.उप कार्यालयाची आवश्यकता काय❓उप कार्यालय इतर ठिकाणी वर्ग करू नये.
11) सावखेडे सिम ता.यावल गावास पेसा क्षेत्रात समाविष्ट करावे. गावाच्या मागणीला आमचा पाठिंबा.सातपुडा पर्वतरांगा व पायथ्याशी असलेल्या सर्व गावांन पेसा मध्ये समाविष्ट करावे जि. प. शाळेला निःशुल्क आधार व जातीचा दाखला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे काढून द्यावे
महीला बचत गट स्थापन करून त्यांना अर्थसहाय्य देण्यात यावे शबरी लाभार्थी यादी मंजुरी देणे
आश्रम शाळेत टेम्पररी भरतीत स्थानिक भरावे
सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार प्रशिक्षण कोर्स सुरू करने
नामांकित शाळांमध्ये यादी जाहीर करणे
यासह निवेदनात नमूद विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली प्रथमता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे आदिवासी साठी असलेल्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरीता यावल प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच जागतिक आदिवासी आदिवासी दिन आदिवासी गावागावात तसेच तालुका ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यासाठी नियोजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा फक्त आदिवासी प्रकल्प कार्यालयात साजरा न करता त्या ऐवजी जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात तो तालुकास्तरावर फिरत्या रोटेशनने साजरा करण्यात यावं या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासोबतच पेसा टीएसपी व्यतिरिक्त इतर ओटीएसपी
गावांमध्यील आदिवासींसाठी असलेल्या ठक्कर बाप्पा तांडा सुधारणा वस्ती योजना समाज मंदीरे यांचा लाभ द्यावा यासह आसेमं कार्यकर्त्यांनी आयत्या वेळी अनेक समस्यांना वाचा फोडली उपाययोजना करण्याची जाणीव करून दिली आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी यांनी निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेण्याची प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदनाद्वारे मागणी मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट स्वांतत्र्य दिनी प्रकल्प कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे यावेळी सांगितले
यावेळी आसेमं आदिवासी सेवा मंडळ चे संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक (राजू ) अलीखां तडवी कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी सर रोशन तडवी, सलीम इस्माईल तडवी, सलीम तडवी एल आय सी हनिफ तडवी वजीर तडवी राजू मुशिर अनिल नजीर तडवी लुकमान तडवी अशरफ तडवी अप्पा युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी पोलीस पाटील जिल्हाध्यक्ष रईस तडवी वसीम महेबुब सकावत तडवी मुनाफ जुम्मा हाजी झिपरु खा तडवीनशिर तडवी शब्बीर तडवी समीर मुबारक अलाउद्दीन तडवी समशेर तडवी ठाकूर दादा,गुलशेर तडवी नासेर भाई न्याजोदिन तडवी महीला पदाधिकारी हाजरा तडवी यांच्यासह मोहरद येथील कार्यकर्ते आसेमं चे नवनिर्वाचित चोपडा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते
No comments