वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दारूबंदी विरोधांत दमदार कारवाई..!! मुद्देमालासह आरोपी ताब्यात...!! सौ. कलावती गवळ...
वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची दारूबंदी विरोधांत दमदार कारवाई..!! मुद्देमालासह आरोपी ताब्यात...!!
सौ. कलावती गवळी ( वर्धा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्धा जिल्हा पोलीस दलातील हिंगणघाट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील अधिकाऱ्यांसह पोलीस हवालदार, अंमलदार कर्मचारी नेहमीच प्रयत्नशील, दिसून येतात. दिनांक 17/07/25 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांतील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई राकेश इतवारे, भारत बुटलेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहिंतीच्या आधारे एक इसम हा विना क्रमांकांच्या हिरो डेस्टिनी मोपेडवर गावठी मोहा दारूची वाहतूक करीत आहे. अश्या मुखबीर कडुन मिळालेल्या खाञीशीर माहिंतीच्या आधारे शहालंगडी मंदिरांकडे जाणाऱ्या वळणावर पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून वाहतूक करणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडून त्याच त्याचे नाव आणि अधिक चौकशी केली असता. संशयित इसम निहाल कमलसिंग ठाकूर, रा. संत कबीर वॉर्ड ) हिंगणघाट असे सांगितले वरून जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून विना क्रमांकाची हिरो डेस्टिनी मोपेड व गावठी मोहा दारू असा जवळपास 92,000 /- रुपयांचा मुद्देमाल माल मिळून आला. संशयिताला पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे आणून आरोपी विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई , भारत बुटलेकर,राकेश इतवारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
No comments