घरफोडी करणारे चार आरोपी धुळ्यातून जेरबंद...LCB ची कारवाई..असा केला तपास वाचा सविस्तर सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
घरफोडी करणारे चार आरोपी धुळ्यातून जेरबंद...LCB ची कारवाई..असा केला तपास वाचा सविस्तर
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१७):-अहिल्यानगर व भिंगार येथे घरफोडी करणाऱ्या 04 आरोपीना धुळे जिल्हयातुन जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून आरोपींकडून घरफोडीच्या 04 गुन्हयांची उकल झाली आहे.बातमीची हकिगत अशी की,फिर्यादी केवळकुमार भगवानदास गांधी,वय 57, रा.सारसनगर,अहिल्यानगर सुदर्शन बंगला हे दि. 03/07/2025 रोजी बाहेरगावी गेले असता अज्ञात आरोपीतांनी त्यांचे राहते घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेले.याबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 379/2025 बीएनएस कलम 305, 331 (3) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील ना उघड घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून,गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.पथकास गुन्ह्याचे तपासात गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी नामे कैलास चिंतामण मोरे,रा.सोनगीर ता.जि.धुळे याने त्याच्या साथीदारासह केला असून ते धुळे शहरात असल्याची माहिती प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीवरून पथकाने धुळे येथे आरोपीतांचा शोध घेऊन कैलास चिंतामण मोरे, वय 44, रा.सोनगीर, ता.जि.धुळे,जयप्रकाश राजाराम यादव,वय 38, हल्ली रा.सोनगीर,ता.जि.धुळे मुळ रा.दिनदासपूर,पो.ओडार, ता.पिंडरा,जि.वाराणसी, उत्तरप्रदेश अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी नमूद गुन्हा त्यांचे साथीदार विरेंद्रसिंग रामकेवलसिंग ठाकुर, रा.हाथगवा,ता.पुंडा, जि.प्रतापगड,उत्तरप्रदेश (फरार),सोपान पाटील,रा.वणी, ता.जि.धुळे पुर्ण नाव माहित नाही (फरार) यांचेसह दि.03/07/2025 रोजी स्वीफ्ट कारमध्ये अहिल्यानगर येथे केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयांतील चोरी केलेले सोने हे रविंद्र आनंद माळी, वय 42,रा.शिरपूर, ता.शिरपूर, जि.धुळे,सुनिल ईश्वर सोनार, वय 35, रा.बालाजीनगर, शिंगावे, ता.शिरपूर, जि.धुळे यांना विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पथकाने आरोपी कैलास चिंतामण मोरे व जयप्रकाश राजाराम यादव यांना विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याचे वर नमूद साथीदारासह अहिल्यानगर शहरात केलेल्या घरफोडीचे गुन्हे केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून 04 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.आरोपी कैलास चिंतामण मोरे याचेकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हयातील चोरी केलेले सर्व सोन्याचे दागीने हे त्यांचे साथीदार रविंद आनंद माळी व सुनिल ईश्वर सोनार यांच्या मार्फतीने सुवर्णकार सागर प्रकाश जगदाळे, रा.आंबेडकर रोड, शिरपूर, ता.शिरपूर, जि.धुळे यास विक्री केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी भिंगार पोलीस स्टेशन गुरनं 379/2025 या गुन्हयाचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख,गणेश धोत्रे,गणेश लोंढे,अरूण गांगुर्डे,फुरकान शेख,सोमनाथ झांबरे,अशोक लिपणे,विशाल तनपुरे,अमृत आढाव,प्रशांत राठोड,महादेव भांड व भगवान धुळे यांनी केलेली आहे.
No comments