adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न....

  Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.... वाशीम प्रतिनिधी (...

 Manwatkar Home Tutorial Washim येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त  अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न....


वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्थानिक वाशिम येथील मानवतकर होम ट्यूटोरियल वाशिम या प्राध्यापक जगदीश मानवतकर सरांच्या कोचिंग क्लासेस वर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .

सविस्तर वृत्त असे की संयुक्त महाराष्ट्र  चळवळीमध्ये आपल्या शाहिरीतून आणि साहित्यातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपल्या माती विषयी अभिमान आणि गर्व निर्माण करणाऱ्या एका साहित्याचा मृत्यू 18 जुलै 1969  रोजी झाला होता . साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे पूर्ण जगभरात आपल्या लेखनासाठी ओळखले जातात . अवघ्या दीड दिवसाची शाळा करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी डोंगराएवढा साहित्य कसे उभे केले हा न उलगडणारा प्रश्न आहे. नशिबालाच गरिबी लाभलेल्या मातंग समाजाच्या एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये साहित्यरण अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच अण्णाभाऊ साठे हे तर्क वितर्क करणारे असल्याने त्यांचा सर्व भर हा साहित्यातून समाज प्रबोधनांमध्ये गेला आहे.  भारतामध्ये भांडवलदारशाही संपवावी आणि त्या ऐवजी कामगारशाही आणावी असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना वाटत होते . त्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्य हे कामगारांसाठी , शोषितांसाठी , कष्ट करणाऱ्यांसाठी खर्च केले होते.  त्यामुळे अशा महान साहित्याला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करणे हे आपले  कर्तव्य आहे. त्यांच्या जीवनकार्यातून विद्यार्थ्यांनी प्रकाश घ्यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  म्हणूनच विद्यार्थ्यांच्या  कलागुणांना  वाव मिळावी याकरिता मानवतकर सरांच्या Manwatkar Home Tutorial Washim या ठिकाणी  अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता . यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश मांडला . त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे भाषणे झाली आणि सर्वांनी आपले विचार मांडले . प्रा. मानवतकर सरांनी ''  आजच्या या दिवशी आपण आपल्या आयुष्यात कधीही गुलामीला बळी पडू नका,  ज्याप्रकारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्याला लढायचे सांगितले आहे.  त्यामुळे आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये लढलं पाहिजे तरच आपल्याला एक दिवस यश नक्की मिळणार .'' असे विचार जगदीश मानवतकर सरांनी कार्यक्रमाच्या वेळी मांडले. प्राध्यापक माधव डोंगरदिवे सर यांची प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लाभली तर राहुल खरात सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.  या कार्यक्रमात अंश राऊत, कु. भावना शिंदे, श्लोक सूर्या, कू.स्नेहल राठोड, आरव मंजराटे, कु.ईश्वरी लोंढे,  आदर्श घुगे या विद्यार्थ्यानी  भाषणे दिली आणि कार्यक्रमांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच याद्वारे कार्यक्रम संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 यामध्ये इयत्ता पहिली ते दहावी तसेच अकरावी ते बारावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे . पालकांना आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश च्या कोचिंग क्लास वर घ्यायचा असेल त्यांनी जगदीश मानवतकर सरांनी मो.न. 9307391785 वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments