रमजान विशेष हुंड्याची कुप्रथा आणि इस्लाम मुस्लिम म्हणून जगू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य आहे की, त्याने आपले संपूर्ण जीवन इस...
रमजान विशेष
हुंड्याची कुप्रथा आणि इस्लाम
मुस्लिम म्हणून जगू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य आहे की, त्याने आपले संपूर्ण जीवन इस्लामी शरीयत (कायदेशास्त्र) नुसार व्यतीत करावे. शरीरअतच्या विरुद्ध
असणाऱ्या अनिष्ट रूढी, परंपरा व असभ्य, अवैध प्रथा सोडल्याच पाहिजेत. विवाहाच्या बाबतीत ज्या अनेक कुप्रथा व रूढी प्रचलितआहे त्यापैकी एक म्हणजे हुंडा पद्धती. जी
शरीयतमधील महरच्या अगदी विरुद्ध आहे. इस्लामी शरीयतने विवाहाच्या बाबतीत वधूपक्षावर कोणतीही जबाबदारी टाकलेली
नाही. उलट वरपक्षानेच आपल्या ऐपतीनुसार लग्नासाठीच्या आवश्यक बाबींवर खर्च करणे
भाग आहे. यात पत्नीची वस्त्रे, आभूषणे, महर, विवाहोत्तर मेजवानी (वलीमा) आणि पत्नीच्या उदरनिर्वाहाचा खर्च अभिप्रेत आहे. विवाहाप्रसंगी
वधूपक्षाने ठरविलेली महर वरपक्षाने विवाहात रोखीने देणे उत्कृष्ट असून आणि महरनंतर देणार असाल तर केव्हा देणार हे निश्चित केले गेले पाहिजे. महर अदा करण्याची पतीची इच्छाच
नसेल तर अशा पतीबाबत प्रेषित मुहम्मद (स.)यांचे खालीलप्रमाणे कथन आहे.ज्याने ठराविक महरच्या मोबदल्यात विवाह केला. मात्र, मनात महर अदा करण्याचा इरादाच नसेल तर तो पती नव्हे व्यभिचारी आहे. (हदीस) यावरून असे स्पष्ट होते की, पत्नीला महरची रक्कम न देणे किती भयंकर अपराध आहे.
सध्या विवाहात महरला नगण्य अथवा दुय्यम स्थान दिले जाते. मात्र हुंड्याला अग्रस्थान दिले जाते. महरची रक्कम अतिशय
कमी ठरविली जाते आणि ती रक्कमही बहुतेक उधार, किंवा लग्नातच रोखीने पत्नीला दिली
जावी. मात्र, हुंडा जो निषिद्ध आहे तो मात्र भरमसाठ ठरवतात व तोही रोख घेतला जातो.
हुंड्यात दिलेल्या वस्तूंचे लग्नाच्या मंडपातच प्रदर्शन केले जाते. ते पाहण्यासाठी लोक येतात
व वाहवा करतात. अशा प्रकारचा हरामाचा माल जेवढा अधिक मिळेल तेवढी वराची
लालसा वाढतच जाते. अल्लाहाचा संदेश आहे हे.
इमानधारकांनो एक दुसऱ्याचा माल अवाज़वी, नाहकपणे हिरावून घेऊ नका. (सुरह अननिसा) ही गोष्ट वरासाठी शोभत नाही की, त्याने
वधूकडील पोषाख परिधान करून विवाह करावा.
वधूपक्षाकडून हुंड्याच्या रूपात आलेल्या संपत्तीवर ऐश, विलास करावा, आपल्या भावी
पत्नीजवळ हुंड्याच्या रूपात मागणी करावी आणि त्याचा निर्लज्जपणे स्वीकार करावा.
ही तर त्याच्या पती नव्हे, भिकारी असण्याचीलक्षणे आहेत.
अब्दुल सरदार पटेल
चोपडा, जि. जळगाव
मो. 8766747092

No comments