बुलढाणा जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव! 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल'च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार्थी यांना निवड पत्राचे थाटात वितरण ...
बुलढाणा जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव! 'महाराष्ट्र शिक्षक पॅनल'च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार्थी यांना निवड पत्राचे थाटात वितरण
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव:- महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' नुकताच बुलढाणा जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना घोषित करण्यात आला आहे. गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कार्थी यांना संत श्री गजानन महाराजांच्या पावन् भूमी शेगांव नगरीत निवड पत्र प्रदान करून शिक्षकांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ आणि सन्मान कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री. गजानन हिंगणे सर यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शेगाव शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुरेश डोसे व राज्य समन्वयक श्री. भास्कर डोसे उपस्थित होते. विशेष म्हणजे, श्री. भास्कर डोसे यांची महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्य समन्वयक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.या आदर्श शिक्षकांचा झाला गौरव
जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी आपल्या कार्याने शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला,अशा खालील मान्यवरांना निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये श्री.सुधीर दाते,श्री. देविदास बावस्कार,श्री. गजानन खोंड,श्री.भास्कर शेगोकार,श्री. सुभाष सुरळकर,कु.अस्मिता क्षिरसागर,कु.मंगला पातळे(आकोटकर),कु.यमुना निलखन,सौ.निलम संजयसिंग पाटील" यांचा समावेश असून हा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण"अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. गजानन हिंगणे यांनी सांगितले की, "शिक्षकांच्या कार्याची दखल राज्य स्तरावर घेतली जाणे, ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे." कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भास्कर डोसे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. अनिल धनभर व श्री. मनोहर खंडेराव यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक श्री. डिगांबर काकड, श्री. गजानन ढगे, श्री. निवृत्ती इंगळे, श्री. अनिल धनभर आणि श्री. मनोहर खंडेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.या निवडीबद्दल सर्व स्तरांतून, विशेषतः शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून या पुरस्कारप्राप्त शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments