मलकापूर येथे जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक तर्फे रक्त गट तपासणी उत्साहात अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर : छत्रपती ...
मलकापूर येथे जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक तर्फे रक्त गट तपासणी उत्साहात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लब तर्फे भव्य रक्त गट शिबिराचे आयोजन दि.१९ फेब्रुवारी २६ रोजी करण्यात आले होते. सदर शिबिर हे हनुमान चौक मलकापूर येथे दिपिका कृषी केंद्राच्या बाजुला घेण्यात आले.सदर शिबिरास नागरिकांच्या वतीने उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमास मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, शिवसेना उपजिल्हा प्रमुख
(उबाठा) गजानन ठोसर, तसेच नगरसेविका उर्मिलाताई जाधव,समाजसेविका स्वातीताई खर्चे यांनी भेट दिली. सदर शिबिरात अनेक शालेय विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविला. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी जिजाऊ मॉर्निंग फिटनेस वॉक क्लब चे अध्यक्ष ॲड.जि.डी. पाटील,सचिव विजय पळसकर व सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष शिवराज जाधव, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल गांधी, संतोषराव रायपुरे, प्रमोद अवसरमोल,अजय जाधव,नगरसेवक राजु पाटील, योगेश येरलीकर,चंद्रशेखर तायडे,बाळासाहेब जोगदंड, शंकर गवळे,बाळू साबळे,अतुल जगदाळे,संदीप जगदाळे,पंकज झनके,ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण भगत,पत्रकार नितीन भुजबळ, अजय काकडे,मुरली पिसे,बापू देशमुख सह फिटनेस क्लब च्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

No comments