शेगाव: भाजप महिला मोर्चातर्फे 'फार्मर्स कट्टा' उपक्रमाचे कौतुक; संतोष रायने यांचा सन्मान अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत...
शेगाव: भाजप महिला मोर्चातर्फे 'फार्मर्स कट्टा' उपक्रमाचे कौतुक; संतोष रायने यांचा सन्मान
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव: नैसर्गिक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने 'सातपुडा नॅचरल कंपनी' अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 'फार्मर्स कट्टा' या उपक्रमाला भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
रसिका हॉटेलचे मालक श्री. संतोष रायने यांनी शेगाव येथे हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. "It Natural... Be Healthy" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य दिले जात आहे. या कार्याची दखल घेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती व सत्कार:
भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. अंजलीताई जोशी यांनी श्री. संतोष रायने यांना शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सन्मानित केले. यावेळी श्री. रायने यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना नैसर्गिक उत्पादनांचे महत्त्व आणि या उपक्रमामागील संकल्पनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी:
सौ. चेतना खेते (सोशल मीडिया संयोजिका)
सौ. संगीता आखरे (सचिव)
सौ. चंदाताई ददगाळ (दिव्यांग आघाडी अध्यक्ष)
नैसर्गिक उत्पादनांमुळे नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी महिला मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

No comments