adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..हायप्रोफाईल गांजा तस्करांचा पर्दाफाश..! ७९ वर्षांचा म्हातारा निघाला विक्रेता

 अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..हायप्रोफाईल गांजा तस्करांचा पर्दाफाश..! ७९ वर्षांचा म्हातारा निघाला विक्रेता  सचिन मोकळं अहिल्...

 अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..हायप्रोफाईल गांजा तस्करांचा पर्दाफाश..! ७९ वर्षांचा म्हातारा निघाला विक्रेता 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२३ मे २०२६ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे छापा टाकून विक्रीसाठी आणलेला तब्बल ७८ हजार रुपये किमतीचा ३.१३७ किलोग्राम गांजा जप्त केला आहे.याप्रकरणी ७९ वर्षीय वृद्धासह गांजा पुरवणाऱ्या बिहारच्या एका इसमाविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती काढण्यासाठी एक विशेष पथक रवाना करण्यात आले होते.या पथकामध्ये पोउपनि.समीर अभंग,पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे आणि चालक उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता.दि.२३ मे रोजी हे पथक बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना,गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी दादा साहदु दिघे हा आपल्या घरी विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगून आहे.माहिती मिळताच पथकाने तात्काळ बेलवंडी पोलीस ठाण्याचे सपोनि नंदकुमार सोनवालकर यांना लेखी रिपोर्ट दिला त्यानंतर सपोनि सोनवालकर,पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर आणि कैलास सिपनकर यांच्या संयुक्त पथकाने आवश्यक साहित्यासह येळपणे गावातील दादा साहदु दिघे (वय ७९ वर्षे) याच्या राहत्या घरावर छापा टाकला.घराची झडती घेतली असता पोलिसांना एक पिशवी आढळली,ज्यामध्ये उग्र वास येत असलेला हिरवट रंगाचा पाला,फुले,बोंडे आणि बिया असलेले ३.१३७ किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला,ज्याची किंमत ७८,००० रुपये आहे.पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ७९ वर्षीय आरोपी दादा दिघे याच्याकडे कसून चौकशी केली असता,त्याने हा गांजा गौतम कुमार यादव (रा. बडगाव शिंदोडी,ता.जि. अहिल्यानगर,मूळ रा.देसपुर माझी,ता.सालिमपुरा,जि. पाटणा,बिहार) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.या कारवाईनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज मोहन साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीं विरुद्ध गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, १९८५ (NDPS Act) चे कलम ८ (क), २० (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १८८/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.

No comments