adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कमळगाव चांदसणी शिवारात अवकाळी पावसाचा तडाखा; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कमळगाव चांदसणी शिवारात अवकाळी पावसाचा तडाखा; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान चोपडा तालुका प्रतिनिधी  (संपादक :- हेमकांत गायकवाड) काल सं...

कमळगाव चांदसणी शिवारात अवकाळी पावसाचा तडाखा; केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान



चोपडा तालुका प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कमळगाव चांदसणी शिवारातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला आहे त्यांनी नुकसान झाल्यास २४ तासांच्या आत विमा कंपनीच्या पोर्टलवर तक्रार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.




No comments