चावलखेडा स्टेशनजवळ रेल्वे अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन (धरणगाव तालुका प्रतिनिधी विकास पाटील) धरणगाव तालुक्या...
चावलखेडा स्टेशनजवळ रेल्वे अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
(धरणगाव तालुका प्रतिनिधी विकास पाटील)
धरणगाव तालुक्यातील चावलखेडा रेल्वे रूळावरील खंबा क्र. 284/22-24 जवळ रेल्वे अपघातात एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना 23 मे 2026 रोजी उघडकीस आली आहे. मृताची ओळख पटलेली नसल्याने धरणगाव पोलिसांनी त्याच्या वारसांचा शोध घेण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
धरणगाव पोलीस स्टेशनचे पो.ना. 585 जितेंद्र भालचंद्र भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पो.स्टे. अ.मृ.रजि.नं. 31/2026 बी.एन.एस.एस. 194 प्रमाणे दि. 23/05/2026 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताचे वर्णन
- *नाव*: अनोळखी पुरुष
- वय : अंदाजे 35 ते 40 वर्षे
- उंची: 5 फूट 8 इंच
- रंग: गोरा, शरीराने मध्यम, चेहरा गोल
- दाढी: वाढलेली
- कपडे: अंगात पांढरा फिकट आकाशी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट
मयताच्या वारसाचा शोध घेणे सुरू असून ओळख पटवण्यासाठी मयताचा फोटोही प्रसिद्धीस दिला आहे.
नागरिकांना आवाहन
सदर वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा तो कोणाचा नातेवाईक असल्यास त्यांनी तात्काळ धरणगाव पोलीस स्टेशनयेथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

No comments