प्रभाग क्रमांक ११ मध्ये कचर्याचे व खड्ड्यांचे साम्राज्य ? लोकप्रतिनिधीच प्रभागात राहत नसल्याने समस्या सोडवणार कोण :- रूचिता नाईक, समाजसेवि...
प्रभाग क्रमांक ११ मध्ये कचर्याचे व खड्ड्यांचे साम्राज्य ?
लोकप्रतिनिधीच प्रभागात राहत नसल्याने समस्या सोडवणार कोण :- रूचिता नाईक, समाजसेविका
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता, २२ :- नालासोपारातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये समेळपाडा येथिल मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यावर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत असून रोज मरे त्याला कोण रडे, अशी परिस्थिती प्रभाग क्र११ मधिल नागरीकांची झाली आहे.
लोकप्रतिनिधी प्रभागात राहत नसल्याचे समस्या सोडवणार कोण असा प्रश्न समाजसेविका रूचिता नाईक यांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग क्रमांक ११ परिसरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात प्रचंड डासांचा उपद्रव झाला आहे तसेच ओला कचऱ्यामुळे घाणेरडा दुर्गंध सुटतो, त्यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रात्रभर कचऱ्याच्या दुर्गंधीचा, डासांचा आणि कुत्र्याचा भुंकण्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे,तसेच दुर्गंधीमुळे रोगराई पसरत आहे. तसेच प्रभाग क्रमांक ११ मधिल नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. या परिसरात डासांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटक नाशक,धुराची फवारणी करण्यात यावी म्हणजे रोगराईला आळा बसेल अशी मागणी स्थानिक नागरीकांनी समाजसेविका रूचिताताई नाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात महापौर अजीव पाटील साहेब यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्याबाबत मागणी करणार आहे.


No comments