adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश

 ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश  चंद्रकांत पाटील विचखेडा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सर्वोदय विद्यामं...

 ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश 


चंद्रकांत पाटील विचखेडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळा, चहार्डी येथील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी Indian Talent Search Examination (ITSE 2025-26) परीक्षेत उल्लेखनीय व अभिमानास्पद यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🌟 राज्यस्तरावर यश संपादन करणारे विद्यार्थी :

  रिनल गणेश कोळी — राज्यातून चौथी

  तुषार ज्ञानेश्वर पाटील — राज्यातून चौथा

🏅 जिल्हास्तरावर यश संपादन करणारे विद्यार्थी :

  भार्गवी महेंद्र पाटील — जिल्ह्यातून पहिली

  हेमांशू संदीप पाटील — जिल्ह्यातून दुसरा

  प्रियल विजय चौधरी — जिल्ह्यातून दुसरी

  अंजली किशोर महाजन — जिल्ह्यातून तिसरी

  फरान राजू पिंजारी — जिल्ह्यातून तिसरा

  शुभ्रा किशोर पाटील — जिल्ह्यातून तिसरी

🏆 केंद्रस्तरावर यश संपादन करणारे विद्यार्थी :

  गार्गी निलेश पाटील — केंद्रातून पहिली

  पवन मनोज शिरसाठ — केंद्रातून दुसरा

  पूर्वा समाधान महाजन — केंद्रातून दुसरी

  रुही अनिल चौधरी — केंद्रातून दुसरी

  हेमश्री सुधीर कांखरे — केंद्रातून तिसरी

विशेष म्हणजे इयत्ता दुसरीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत वर्गाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती जयश्री सुदाम पाटील यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शरद पाटील सर यांचेही मोलाचे सहकार्य व प्रेरणा विद्यार्थ्यांना लाभली.

यावेळी चहार्डी विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पराग पाटील, सेक्रेटरी ॲड. प्रकाश आनंदराव पाटील, संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य, शालेय समितीचे चेअरमन व सदस्य, मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती जयश्री सुदाम पाटील यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments