वादळी वाऱ्याने शेडनेटचे लाखोंचे नुकसान; सुळे येथील शेतकरी प्रकाश पाटील यांना तातडीच्या मदतीची मागणी किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमक...
वादळी वाऱ्याने शेडनेटचे लाखोंचे नुकसान; सुळे येथील शेतकरी प्रकाश पाटील यांना तातडीच्या मदतीची मागणी
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : तालुक्यातील सुळे येथील शेतकरी प्रकाश पाटील यांचे वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यात त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पाटील यांनी शेती व्यवसाय अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कर्ज काढून शेडनेट उभारले होते. मात्र अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
प्रकाश पाटील यांच्यावर बँकेचे कर्ज असून, शेडनेटच्या नुकसानीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. या घटनेमुळे ते हतबल, निराश आणि चिंताग्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे तसेच शासनाने विशेष आर्थिक मदत व भरपाई जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी प्रकाश पाटील यांनी केली आहे.
वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने तत्परतेने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments