शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मंगेश निळे यांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार 2026 प्रदान सतिश गायकवाड मुक्ताईनगर : (स...
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; मंगेश निळे यांना राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार 2026 प्रदान
सतिश गायकवाड मुक्ताईनगर :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिक्षण क्षेत्रात गेल्या १३ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे श्री. मंगेश निळे यांना "राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार 2026" प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे दि. ७ जून रोजी आयोजित विशेष सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री Nivedita Pagar यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बी दि चेंज फाऊंडेशन, शिर्डी यांच्या वतीने श्री साई पालखी निवारा, निघोज येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात निळे सरांना कुटुंबीयांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
मंगेश निळे यांनी शिक्षण क्षेत्रात १३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची Indian Space Research Organisation (ISRO) सारख्या प्रतिष्ठित संस्थांच्या शैक्षणिक भेटीसाठी निवड होण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तसेच मुक्ताईनगर व परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देत मागील वर्षी तसेच चालू वर्षातही चार विद्यार्थ्यांची बाल वैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड होण्यामागे त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे.
शिक्षण, गुणवत्ता विकास आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बी दि चेंज फाऊंडेशनने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविले. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


No comments