सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या मलकापूर तालुकाध्यक्षपदी अपरेशराजे तुपकरी, महिला तालुकाध्यक्षा म्हणून रतिका सपकाळ यांची नियुक्ती अमोल बाव...
सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या मलकापूर तालुकाध्यक्षपदी अपरेशराजे तुपकरी, महिला तालुकाध्यक्षा म्हणून रतिका सपकाळ यांची नियुक्ती
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या मलकापूर तालुकाध्यक्षपदी रक्तदाता अन्नदाता मलकापूर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अपरेशराजे तुपकरी यांची तर महिला तालुकाध्यक्षा पदी सौ. रतिका सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, माजी सैनिक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच लवकरच संपूर्ण मलकापूर तालुक्यात विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख आणि त्यांच्या कोअर कमिट्यांची बांधणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मलकापूर शहर व ग्रामीण भाग अशा दोन्ही स्तरांवर फाऊंडेशनचा विस्तार करण्यात येणार असून सामाजिक कार्याची आवड असलेल्या महिला, पुरुष, युवक व युवतींनी संघटनेशी जोडावे, असे आवाहन सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा सौ. रुपालीताई बोंडे यांनी केले आहे.इच्छुक समाजसेवकांनीअपरेशराजे तुपकरी (तालुकाध्यक्ष) – 9604900806
सौ. रतिका सपकाळ (महिला तालुकाध्यक्षा) – 74990 85809 पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments