adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बारी जंगलात अवैध वृक्षतोड करणारा नवापूर वन विभागाच्या जाळ्यात; आरोपीला १० जूनपर्यंत वन कोठडी

 बारी जंगलात अवैध वृक्षतोड करणारा नवापूर  वन विभागाच्या जाळ्यात; आरोपीला १० जूनपर्यंत वन कोठडी  नवापूर प्रतिनिधी : पंकज आहिरे  (संपादक : हेम...

 बारी जंगलात अवैध वृक्षतोड करणारा नवापूर  वन विभागाच्या जाळ्यात; आरोपीला १० जूनपर्यंत वन कोठडी 


नवापूर प्रतिनिधी : पंकज आहिरे 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

नवापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत बारी येथील जंगलात अवैध वृक्षतोड करणाऱ्या एका व्यक्तीवर वन विभागाने धडक कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला १० जून २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर व वनक्षेत्र कर्मचारी हे दिनांक ७ जून २०२६ रोजी नियतक्षेत्र बारी, कक्ष क्रमांक ५९ मध्ये नियमित गस्त घालत असताना एका व्यक्तीकडून अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले.वन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत नानजी भाद्या नाईक (रा. बारी) यास घटनास्थळी ताब्यात घेतले.

यानंतर आरोपीस वनक्षेत्र कार्यालय, नवापूर येथे आणून त्याच्याविरुद्ध आवश्यक गुन्हेगारी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. पुढील दिवशी, दिनांक ८ जून २०२६ रोजी आरोपीला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, नवापूर येथे हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीस १० जून २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली.

सदर कारवाई महाशय वनसंरक्षक नीनू सोमराज (धुळे), उपवनसंरक्षक संतोष सस्ते (नंदुरबार), विभागीय दक्षता पथक अधिकारी सदगीर (धुळे), सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा (नंदुरबार) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर (नवापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल ए. एम. शेख (वडकळंबी) हे करीत असून जंगलातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

No comments