प्रतिनिधी : अमोल बावस्कर मलकापूर : राज्यामध्ये एक जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या...
प्रतिनिधी : अमोल बावस्कर
मलकापूर : राज्यामध्ये एक जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे सदरच्या कालावधीमध्ये राज्यातील शाळां
मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहे सदर अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जे डी भटकर साहेब तसेच श्री परेश पडोळकर (समन्वयक) यांनी मलकापूर तालुक्यातील जि प मराठी प्राथमिक शाळा लोणवडी शाळेला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याविषयी चे विविध उपक्रम मध्ये गुजरात राज्याची निवड केल्याने त्या राज्याचे सांस्कृतिक कार्यक्रम ,खानपान ,सण ,उत्सव ,पेहराव ,राष्ट्र उभारणीत योगदान इत्यादी कार्यक्रम सुरू होते त्यास मार्गदर्शन केले तसेच वृक्ष लागवड व जोपासना स्वच्छता परसबाग सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प नवभारत साक्षरता अभियान शालेय सजावट विविध क्रीडा स्पर्धा आयोजन सार्वजनिक आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले यावेळी विविध उपक्रमाबाबत साहेबांनी आनंद व्यक्त केला तसेच पुढील आवश्यक सूचना दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक खोडके व शाळेतील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती


No comments