adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिवंतपणी माझ्या दोन्ही किडण्या आणि इतर किमती अवयव महाराष्ट्र शासनाला दान करणार- सोपान रावडे

  जिवंतपणी माझ्या दोन्ही किडण्या आणि इतर किमती अवयव महाराष्ट्र शासनाला दान करणार- सोपान रावडे १) मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य  २)...





 जिवंतपणी माझ्या दोन्ही किडण्या आणि इतर किमती अवयव महाराष्ट्र शासनाला दान करणार- सोपान रावडे

१) मा. मुख्यमंत्री साहेब,

महाराष्ट्र राज्य

 २) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,जिल्हा परिषद, अहमदनगर


 विषय :- समाजहितासाठी वेळोवेळी केलेल्या तक्रारींनुसार कारवाई करणे आपणाला शक्य असल्यास त्यानुसार तातडीने चौकशी,कारवाई करावी किंवा त्या तक्रारींनुसार कारवाई करणे शक्य नसल्यास माझ्या दोन्ही किडण्या, इतर किमती अवयव काढून घेऊन त्यापासून मिळणारी रक्कम महाराष्ट्र शासनाला जमा करून घेण्यासाठी निवेदन 


           निवेदक :- सोपान बाबाबसाहेब रावडे [ ८६००९९२७७४ ]

  मु.पो. कांगोणी ता. नेवासा जिल्हा अहमदनगर


मा. महोदय,

 वरील विषयान्वये विनंती की, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिति, सर्व ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य केंद्र, शाळा यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक, कर्तव्यात कसूर, अनियमितता, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लेखी आदेशाचे पालन न करणे, शासन निर्णय, परिपत्रक यांचे पालन न करणे, कार्यालयात उपस्थित न राहणे या व इतर विषयांबाबत आपणाकडे व इतर सबंधित अधिकारी, पदाधिकारी यांचेकडे शासन आणि समाजहितासाठी वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु त्या तक्रारींची अजूनही योग्य दखल घेऊन संपूर्ण चौकशी आणि दोषींवर कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आलेली नाही तसेच चौकशी अहवालात दोषी आढळून आले तरीही त्यांच्यावर जाणीवपूर्वक अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करणार्‍यांची हिम्मत अजून वाढली असून अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच विभागातील जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी हे बिनधास्त, राजरोसपणे भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करीत आहे त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात लोकशाहीचे काही अस्तित्व शिल्लक आहे का नाही असा प्रश्न आम्हाला आणि सर्व सामान्य जनतेला पडला आहे.


         भ्रष्टाचार, शासनाची फसवणूक करणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसल्यामुळे त्यांच्याकडून किंवा त्यांच्यामार्फत इतरांकडून माझी आणि माझ्या कुटुंबियांची कधीही हत्या होऊ शकते. माझी हत्या झाल्यावर माझे शरीरातील किमती अवयव वाया जाऊ नये म्हणून माझी हत्या होण्यापूर्वीच माझ्या दोन्ही किडण्या आणि इतर किमती अवयव हे महाराष्ट्र शासनाला दान करण्याचा निर्णय घेतला आहे .


            आमची मागणी खालीलप्रमाणे आहे

१) या निवेदनासोबत दिलेल्या तक्रारी, उल्लेख केलेल्या तक्रारी, समाजहितासाठी आपल्या कार्यालयात वेळोवेळी केलेल्या सर्व तक्रारींनुसार कारवाई करणे आपणाला शक्य असल्यास त्या तक्रारींची दखल घेण्यास जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करणार्‍या, वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश, शासननिर्णयाचे पालन न करणार्‍या सर्व दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, वेळोवेळी केलेल्या सर्व तक्रारींची संपूर्ण चौकशी करून त्यात आढळून आलेल्या सर्व दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.


       मला व माझ्या कुटुंबियांना तात्काळ पोलिस संरक्षण देण्यात यावे.   

                  किंवा

१) समाजहितासाठी आम्ही वेळोवेळी दिलेल्या तक्रारीनुसार चौकशी व कारवाई करता येणे आपणाला शक्य नसल्यास माझ्या दोन्ही किडण्या व इतर किमती अवयव काढून घेऊन त्यापासून मिळणारी रक्कम महाराष्ट्र शासनाला जमा करण्यात यावी.


       सदर निवेदनानुसार कारवाई न झाल्यास २०/०२/२०२४ पासून जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत (आवश्यक असल्यास इतर वेळी) माझ्या संपूर्ण शरीराचे महाराष्ट्र शासन दान घेऊन माझे शरीर जमा करून घेईपर्यंत बेमुदत देहदान आंदोलन करणार आहे.

No comments