जि.प.शाळा खेडीभोकरी येथे बालसंसद अंतर्गत मतदान प्रक्रिया संपन्न चोपडा प्रतिनिधी नुकतीच जिल्हा परिषद शाळा खेडीभोकरी येथे शालेय मंत्रिमंडळ...
जि.प.शाळा खेडीभोकरी येथे बालसंसद अंतर्गत मतदान प्रक्रिया संपन्न
चोपडा प्रतिनिधी
नुकतीच जिल्हा परिषद शाळा खेडीभोकरी येथे शालेय मंत्रिमंडळ निवडण्याकरिता बालसंसद अंतर्गत वार्षिक निवडणूक घेण्यात आली.
सर्व प्रक्रिया सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशी पार पाडली जाते याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. निवडणूक सुरू होण्यापूर्वी निवडणुकीच्या निवडलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखील घेण्यात आले.यावेळी रूही पाटील यांची मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तर जान्हवी कोळी, पूर्वी पाटील,प्राची पाटील यांची मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात. पोलीस कर्मचारी म्हणून मोहित पाटील व पुष्पराज पाटील तर भावेश भिल याने शिपाई कर्मचारी म्हणून काम पाहिले. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेद्वारे एकूण 99 विद्यार्थ्यांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान मिळालेल्या दिव्या भाईदास कोळी हिला मुख्यमंत्री म्हणून तर दुसऱ्या क्रमांकावर मते मिळवलेल्या तेजल प्रभाकर पाटील हिला अभ्यासमंत्री पद देण्यात आले तर,आयुष कोळी क्रीडामंत्री, कुलदीप पाटील स्वच्छता मंत्री, जान्हवी कोळी आरोग्य मंत्री, पूर्वी पाटील सांस्कृतिक मंत्री, सहल मंत्री प्राची पाटील रुही पाटील अर्थमंत्री असे खातेवाटप विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री रमेश शिरसाठ यांनी काम पाहिले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री भास्कर पाटील यांनी मतदानाच्या हक्क का बजवावा याविषयी व लोकशाही विषयी जनजागृती केली. कार्यक्रमाचे नियोजन श्री विक्रम बोरसे व रोहिदास कोळी यांनी पार पाडले
No comments