Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात प्रथमच जि. प.शाळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम

  विटनेर जि.प.शाळेत रंग तरंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहा चोपडा तालुक्यात प्रथमच जि. प.शाळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम  संपादक : हेमकांत गाय...

 विटनेर जि.प.शाळेत रंग तरंग सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहा

चोपडा तालुक्यात प्रथमच जि. प.शाळेत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम 



संपादक : हेमकांत गायकवाड 


चोपडा 


तालुक्यातील विटनेर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणेश एकनाथ गुजर तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अविनाश पाटील, केंद्रप्रमुख प्रमोद बाविस्कर चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर भानुदास पाटील, विटनेर येथील सरपंच कविता पाटील,उपसरपंच संगीताबाई कोळी,ग्रामसेवक रविंद्र महाजन,तलाठी आर के पाटील,ज्ञानेश्वर पाटील,राजेंद्र पी.पाटील,कुरवेल हायस्कूल चे उपशिक्षक गजानन पाटील,उपक्रमशिल शिक्षक अशोक पाटील,दीपक पाटील,ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील,यमुनाबाई कोळी,देविदास रायसिंग,निलेश कोळी आदी उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगीग टशिक्षणाधिकारी अविनाश पाटील यांनी मत व्यक्त केले ते म्हणाले जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन विटनेर या गावाने बदलला आहे.याचे श्रेय विटनेर कर ग्रामस्थ यांना जाते.गावात मुलांच्या शिक्षणाकडे आईंचे लक्ष जास्त आहे.आई हे विद्यापीठ आहे.मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणारे कार्यक्रम शाळेने वर्षभर राबवले पाहिजेत.विटनेर गावाला खुप मोठा इतिहास आहे त्या इतिहासाच्या वसा घेऊन गाव भविष्य घडवत आहे.तसेच चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर पाटील यांनी आपले मत व्यक्त केले ते म्हणाले मी पण याच शाळेचा विद्यार्थी आहे.सद्या मुलांचे लक्ष मोबाईल कडे जास्त आहे जे अतिशय वाईट आहे मुलांनी गरज म्हणून मोबाईल चा वापर केला पाहिजे त्याच व्यसन लागू नये ही काळजी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांच्या अभ्यास आणि खेळाकडे लक्ष दिले पाहिजे.संपूर्ण कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश गुजर यांनी एक्कावन्न हजार रुपयाची देणगी दिली तसेच उपक्रमशिल शिक्षक अशोक पाटील यांनी एकवीस हजार रुपये,डॉ गजानन पाटील यांनी अकरा हजार रुपयांची देणगी दिली.पप्पांनी गणपती आणला,उदे गं अंबे उदे,मामाच्या पोरीला गाडीवर फिरवीन,बायकांचे उखाणे,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा या कार्यक्रमांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विटनेर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर धनगर यांनी तर सूत्रसंचालन हेमंत पाटील आभार नामदेव अहिरे यांनी मानले.

No comments