तामथरे केंद्र शाळेत भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण विभाग प्रमुख : अमोल बावस्कार तामथरे.... तालु...
तामथरे केंद्र शाळेत भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण
विभाग प्रमुख : अमोल बावस्कार
तामथरे.... तालुका शिंदखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा तामथरे येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची केंद्र शाळा आहे. शाळेत गावातील उपसरपंच मनोहर भगवान बोरसे उर्फ पप्पू दादा यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सेवानिवृत्त शिक्षक स्व भगवान
विठ्ठल बोरसे यांच्या स्मरणार्थ केंद्र शाळेस भव्य प्रवेशद्वार बांधून दिले. या प्रवेशद्वाराचे लोकार्पण अरुणाताई भगवान बोरसे यांच्या हस्ते फीत कापून कऱण्यात आले.
याप्रसंगी गावाचे सरपंच. देवनाथसिंग गिरासे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. रामभाऊ गायकवाड उपाध्यक्ष भटू ढीवरे, माजी सरपंच योगेंद्रसिंग गिरासे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पोलीस पाटील निरंजन गिरासे, नवल टाटा रणजीत गिरासे भिमसिंग गिरासे ग्रामसेवक तारकेश्वरी सोनवणे, कोमल सिंग गिरासे संजय धिवरे, संजीव चौधरी , मनोहर गिरासे ,सुरेश भिल, प्रितेश येवले हे उपस्थित होते.
आपल्या गावातील शाळेसाठी भरीव मदत द्यावी या विचाराने स्व.भगवान विठ्ठल बोरसे यांच्या मुलांनी स्वखर्चातून दोन लक्ष रुपयाचे प्रवेशद्वार शाळेस बांधून दिले. या प्रवेशद्वारामुळे शाळेच्या वैभवात भर पडली आहे. याप्रसंगी अरुणाताई भगवान बोरसे म्हणाल्या," गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात आणि या शाळेसाठी भरीव मदत करावी. शालेय परिसर सुरक्षित व्हावा या हेतूने प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ राजेंद्र बळीराम येवले यांनीही आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी पाच हजार रुपये किमतीची पितळी घंटा भेट दिली.
यावेळी वस्तूंचे लोकार्पण संपन्न झाले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भगवानसिंग राजपूत म्हणाले, "शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा या वचनाप्रमाणे ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचे रूप पालटले आहे.
यावेळी विविध वेशभूषेतील कलाकारांनी वातावरण देशभक्तीपर झाले.भारत माता,छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ महात्मा गांधी, पंडित नेहरू , ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस भगतसिंग, झाशीची राणी यांची वेशभूषा केली.शालेय विद्यार्थ्यांनी जवानांच्या वेशभूषेत मान्यवरांना सलामी दिली. पथसंचलन करून उपस्थितांची मने जिंकली. पत संचलनासाठी गावातील शाळेच्या माजी विद्यार्थी शुभम ढेरे, सविता नेरकर व सिद्धार्थ नेरकर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक लोटन कोळी यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी युवराज एशी ,अनंत वाघ, सचिन देवरे ,वैशाली बिराडे ,कविता कोळी यांनी परिश्रम घेतले.
शैक्षणीक ग्रामसभा
शासन परिपत्रकानुसार शैक्षणिक ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील माता भगिनी, पालक , शिक्षिका व मदतनीस, आशा कार्यकर्ती शिक्षण प्रेमी नागरिक यांची उपस्थिती लाभली.
या शैक्षणिक ग्रामसभेत शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा, आवश्यक गरजा आणि अडचणी शैक्षणिक गुणवत्ता ,याविषयी ठराव घेण्यात आले.
शैक्षणिक ग्रामसभेत मदतीचे आवाहन गावाचे सरपंच देवनाथ सिंग गिरासे यांनी केले.
No comments